शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य क्रमांकाची सांगलीत तीस वाहने जप्त

By admin | Updated: July 25, 2014 23:36 IST

शहरात धरपकड : वाहतूक पोलिसांची कारवाई

सांगली : वाहनांवर नियमबाह्य क्रमांक टाकणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी आज (शुक्रवार) अचानक धरपकड सुरु केली. शहरात दिवभरात नियमबाह्य क्रमांकाची ३० वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये डिझेलवरील सहा रिक्षांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली. वाहनाची नंबर प्लेट कशी असावी, यासाठी नियमावली आहे. मात्र या नियमाचे कुणीही पालन करताना दिसत नाही. अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. पुढील बाजूस क्रमांक लिहिलेला असतो, मात्र मागे प्लेटवर स्वत:चे नाव, अथवा आडनाव, किंवा राजकीय नेत्याचा फोटो लावलेला असतो. महाविद्यालयीन तरुणांच्या दुचाकीवर ग्रुपची नावे लिहिण्यात आलेली आहेत. एखाद्या दुचाकीने रस्त्यावर कुणाला ठोकरले, तर नागरिकांना त्या दुचाकीचा क्रमांकही टिपता येत नाही, असा क्रमांक असतो. यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी अशा दुचाकींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक पोलिसांकडून सातत्याने ही कारवाई सुरु आहे. सावंत यांनी महाविद्यालयातील ग्रुपची दादागिरी मोडीत काढली आहे. तरीही काही तरुण ग्रुपचे नावे लिहीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासाठी सावंत यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक गोर्ले यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून ग्रुपचे नाव असो अथवा नियमबाह्य क्रमांक लिहिलेली दुचाकी, या सर्वांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळपर्यंत ३० वाहने जप्त करण्यात आली होती. दुचाकी सोडविण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक शाखेसमोर मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)हारकुन टुमजप्त करण्यात आलेल्या विविध नंबर प्लेटवर ‘सरपंच हरभा तालीम’, ‘धाकलं पाटील’, ‘राज’, ‘पवार’, ‘हारकुन टुम’, ‘हिरकणी’, ‘आबा’, ‘कसं काय’, असा उल्लेख आहे. याशिवाय राजकीय नेत्यांचे तसेच महापुरुषांचे फोटोही लावले आहेत.