शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मिरज शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 14, 2015 00:03 IST

पोलीस यंत्रणेला आव्हान : एकाच दिवसात चोरीच्या चार घटनांनी खळबळ

मिरज : मिरजेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाचदिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्यांचे प्रकार घडले. दोन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे ८० हजार किमतीचे दागिने लंपास करण्यात आले. आठवडा बाजारात मोबाईल चोरण्यात आला. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून वाळूचा ट्रक पळवून नेण्यात आला. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी टाकळी रस्त्यावरील म्हेत्रे मळ्यात महिलांचे ५० हजार किमतीचे दागिने लंपास केले. राजू जोतिराम मंडले यांचे कुटुंबीय झोपेत असताना घराच्या दरवाजाची कडी काढून चोरटे आत शिरले. चोरट्यांनी घरात झोपलेल्या मंडले कुटुंबातील दोन महिलांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे गंठण व अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र ब्लेडने कापून घेतले. दागिने काढून घेताना एका महिलेस जाग आल्यानंतर तिने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी पलायन केले. याप्रकरणी राजू मंडले यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. गंगानगर येथेही असाच प्रकार घडला. घराचे बांधकाम सुरू असल्याने विनायक नाईक कुटुंबीय पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी रात्री शेडच्या दरवाजाची कडी काढून आत प्रवेश केला व रेणुका विनायक नाईक यांचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार रोख रक्कम व मोबाईल असा ऐवज असलेली पर्स लंपास करण्यात आली. आज सकाळी जाग आल्यानंतर नाईक यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. रेल्वे स्थानकालगत असलेल्या गंगानगर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. येथे वारंवार घरफोड्या व चोऱ्यांमुळे नागरिक हैराण आहेत. शहरातील आठवडा बाजारात मोबाईल व महिलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या सुरूच आहेत. मंगळवार पेठ आठवडा बाजारात प्रकाश आनंदा माळी (रा. हडको कॉलनी मिरज) हे भाजी खरेदीसाठी आले असताना, त्यांचा २८ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. चोऱ्यांच्या घटनांमुळे आठवडा बाजारात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी सोमनाथ गुंडे व सचिन झाडगे यांनी एका मुलास संशयावरून हटकले असता, त्याच्याकडे चोरीचा मोबाईल सापडला. विनापरवाना वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेला ट्रक मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारातून पळवून नेण्यात आला. याप्रकरणी ट्रकमालकाविरूध्द शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाळू ट्रक पळवून नेण्याची ही तिसरी घटना आहे. दि. ४ रोजी मिरज-पंढरपूर रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा (एमएच १४ सीयू. ००३४) क्रमांकाचा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने पकडला होता. सहा ब्रास वाळूसह ट्रक ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात उभा करण्यात आला होता. दि. ८ रोजी रात्रीच्या वेळी ट्रक पळवून नेला. याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांनी ट्रक मालक दत्तात्रय शहाजी गायकवाड (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) याच्याविरूध्द गौणखनिज चोरीची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)