शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थी प्रवृत्तीला अजिबात थारा नको

By admin | Updated: September 11, 2014 23:04 IST

विजय सगरे : महांकाली कारखान्याच्या प्रचारास प्रारंभ

कवठेमहांकाळ : राजकीय स्वार्थासाठी महांकाली कारखान्याच्या तालुक्यातील विकास केंद्रात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला जनतेने व सभासदांनी खड्यासारखे वेचून बाजूला फेकावे, त्यांना थारा देऊ नका, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी केले. आज (गुरूवार) कवठेमहांकाळ येथील महांकालीदेवीच्या मंदिरात महांकाली कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजयराव सगरे म्हणाले, कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागात नानासाहेब सगरे यांनी महांकाली कारखान्याच्यारुपाने लावलेले विकासाचे रोपटे आजवर आपण जिद्दीने वाढविले व जपले आहे. परंतु राजकीय स्वार्थापोटी काही विरोधक कारखान्याची निवडणूक लावून या विकास केंद्रात अडथळा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु तालुक्यातील सभासद व जनता विरोधकांचे हे कटकारस्थान मोडून काढेल, असा विश्वासही सगरे यांनी व्यक्त केला.माणिकराव भोसले म्हणाले की, विजयराव सगरे, तुम्ही राजकीय भूमिका घेताना उघडपणे आबांच्या पाठीमागे उभे राहा आणि तुमच्याबाबत असणारा गैरसमज खोडून काढा. आम्ही कॉँग्रेस पक्षाच्यावतीने ठामपणे तुमच्या पाठीशी उभे राहू.सुरेश पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे सर्व सेनापती व सैनिक कारखान्याच्या निवडणुकीत सगरे यांच्या पाठीशी उभे राहून विरोधकांना चारीमुंड्या चित करतील. तसेच गृहमंत्री पाटीलही आपली सर्व ताकद सगरेंच्या पाठीशी उभी करतील. त्यामुळे विरोधकांची डाळ कदापी शिजणार नाही.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नामदेवराव करगणे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने महांकाली कारखान्याच्या निवडणुकीत विजयराव सगरेंना पूर्ण ताकद देऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब गुरव, विठ्ठलराव कोळेकर यांचीही भाषणे झाली. चंद्रकांत हाक्के, भानुदास पाटील, किसन पाटोळे, पिंटू कोळेकर, किशोर पाटील, आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब पाटील, गणपती सगरे, सुरगौंड पाटील, बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील, अनिल शिंदे, जगन्नाथ कोळेकर, पतंगराव यमगर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)