शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

..त्यामुळे जयंत पाटील यांचा पराभव, माझ्यावर खापर फोडण्याची गरज नाही; मानसिंगराव नाईक यांचे प्रत्युत्तर

By अशोक डोंबाळे | Updated: July 16, 2024 19:05 IST

त्यांना पडलेली १२ मते शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचीच

सांगली : भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा पराभव त्यांना मतांचे गणित जुळवताना न आल्यामुळे झाला आहे. परंतु, त्यांच्या या अपयशाचे खापर त्यांनी माझ्यावर फोडण्याची गरज नाही, असे सडेतोड उत्तर सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष व शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिले.शेकापचे जयंत पाटील यांनी 'आमदार मानसिंगराव नाईक यांचं मत फुटलं' असा आरोप केला होता. या आरोपाला उत्तर देताना मानसिंगराव नाईक बोलत होते. नाईक म्हणाले, जयंत पाटील यांचे स्वत:चे एकही मत नाही. तरीही ते विधान परिषदेच्या निवडणूकीत उतरले. त्यांनी मताचे गणित जुळवायला पाहिजे होते.

त्यांनी एमआयएम पक्षासह अन्य छोट्या पक्षांची मते मिळणार असे सांगितले होते. परंतु, त्यांना त्यापैकी एकही मत मिळाले नाही. काँग्रेसकडूनही उध्दवसेनेला मदत झाली. म्हणूनच जयंत पाटील यांचा पराभव झाला. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची १२ मतेच त्यांना मिळाली असून उर्वरित एकही मत त्यांना मिळाले नाही. असे असतांना त्यांनी माझ्यावर त्यांच्या पराभवाचे खापर फोडणे योग्य वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांच्याकडूनही विचारणाशरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शेकापचे जयंत पाटील यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ''आमच्या आमदारांवर मत फुटल्याचे आरोप कशाच्या आधारावर केला आहे?'' अशी विचारणा केली आहे. यावर त्यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही. सध्या त्यांची चूक लक्षात आल्यावर दुसरेच नाव घेत आहेत, असेही मानसिंगराव नाईक म्हणाले.लोकसभा निवडणुकीचाही फटकारायगड लोकसभा निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांनी मदत केली नाही, म्हणून उद्धवसेना नाराज होती. म्हणूनच उद्धवसेनेकडून उमेदवार उभा केला. या उमेदवारास काँग्रेसकडून मदत झाली, म्हणून ते विजय झाले आणि जयंत पाटील पराभूत झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, असेही मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीMansingrao Naikमानसिंगराव नाईकJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस