शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना नाराज, राष्ट्रवादीशी दोस्ताना; सांगली जिल्हा परिषदेत भाजपला वगळून सत्ता स्थापनेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:16 IST

सत्तेचे गणित कसे असणार?

सांगली : जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचा तिढा कायम असून, महायुतीअंतर्गत असलेले मतभेद समोर आले आहेत. पर्यटनमंत्री तसेच शिंदेसेनेचे सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपने सत्तेसाठी गृहीत धरल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षानेही भाजपला प्रतिसाद दिलेला नाही. महायुतीत मतभेद निर्माण झाले असतानाच भाजपला वगळून अन्य प्रमुख पक्षांची आघाडी करीत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत छुप्या बैठकांना सुरुवात झाली असून, आमदार जयंत पाटील यांनी यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. याशिवाय महायुती व महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ काठावरच येते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी खेचाखेची व नव्या खेळ्यांना सुरुवात झाली आहे. तिकीटवाटपात भाजपने शिंदेसेना व अजित पवार गटाला फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याने दोन्ही पक्ष आता तोच मुद्दा पकडून भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचे नेते सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीबाबत मित्रपक्षांशी चर्चा झाल्याचे सांगत असतानाच शंभूराज देसाई यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजप व मित्रपक्षांचे सूर जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच गोष्टीची संधी साधत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील हे शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी मैत्रभाव दाखवत सत्तास्थापनेची गणिते जुळवत आहेत. यासाठी छुप्या खेळ्या सुरू झाल्या आहेत. दोन दिवसांत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिंदेसेना भूमिका जाहीर करणार आहे.

सत्तेचे गणित कसे असणार?राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या १८, काँग्रेसच्या ११ व उद्धवसेनेची एक जागा अशी आघाडीची गोळाबेरीज ३० च्या घरात जाते. महायुतीची गोळाबेरीच ३१ होते, मात्र महायुतीत वाद होत असल्याने सत्तेचे समीकरण जुळलेले नाही. जयंत पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिंदेसेनेला एकाच मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. यातील एका पक्षाशी सूर जुळले तरीही सत्तेचा सोपान चढता येतो म्हणून मोर्चेबांधणी होत आहे. त्यांची ही खेळी यशस्वी झाली तर भाजपला वगळून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली जाऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena upset; Alliance with NCP; BJP sidelined in Sangli Zilla Parishad.

Web Summary : Sangli Zilla Parishad faces a power struggle as Shinde Sena expresses discontent with BJP. Alliance talks are on with NCP, sidelining BJP. Jayant Patil is leading efforts for alternative coalition to form government. Decision expected soon.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीMahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस