शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महापालिकेत राजकीय यू टर्न; काल ज्यांनी पाडलं, आज तेच भाजपच्या विजयात पुढे...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:49 IST

२०२१चा पराभव विसरून भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शीतल पाटीलसांगली : राजकारणात कालचे वैरी आजचे दोस्त कसे होतात, याचा प्रत्यय सांगली महापालिकेच्या सत्ताकारणातून पुन्हा एकदा येत आहे. सत्ता, संधी आणि समीकरणं बदलली की भूमिका कशा बदलतात, याचं हे उदाहरण ठरत आहे. २०२१ मध्ये महापौर-उपमहापौर निवडीत भाजपला धक्का बसला होता. पक्षातील सात नगरसेवकांच्या बंडामुळे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार गजानन मगदूम यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवामागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची भूमिका बजावली होती. भाजपचा पराभव व्हावा यासाठी जे चेहरे तेव्हा आक्रमकपणे मैदानात उतरले होते, तेच चेहरे आज भाजपच्या विजयासाठी पुढे असल्याचे चित्र बुधवारी दिसत आहे. कालचा विरोध आज पाठिंब्यात बदलल्याने सांगलीच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.तो महिनाही होता २०२१ मधील फेब्रुवारी... तारीख होती २३... महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत होते. अडीच वर्षे सत्ताही भाजपची होती. भाजपचे ४१ अधिक दोन अपक्ष असे ४३ संख्याबळ. महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि गणितेच बदलू लागली. भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी काँग्रेससोबत नाराज भाजप नगरसेवकांना आपल्या गळाला लावून महापौर-उपमहापौर निवडीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.कोरोनामुळे ऑनलाइन मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक या भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी व उपमहापौरपदाचे उमेदवार काँग्रेसचे उमेश पाटील यांना मतदान केले. भाजपचे आनंदा देवमाने आणि शिवाजी दुर्वे गैरहजर राहिले. भाजपला धीरज सूर्यवंशी व गजानन मगदूम यांचा पराभव जिव्हारी लागला होता.पाच वर्षांनंतर राजकीय चक्र पुन्हा फिरलं आहे. महापालिकेची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने वेगवेगळी लढली तरी सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजपने महापौरपदासाठी पुन्हा एकदा धीरज सूर्यवंशींवर विश्वास दाखवला, तर राष्ट्रवादीतून निवडून आलेले गजानन मगदूम उपमहापौरपदाचे उमेदवार केले. कालपर्यंत विरोधात रणशिंग फुंकणारी राष्ट्रवादी काँग्रेस आज भाजपसोबत युतीत सहभागी झाली.२०२१ मधील भाजपचा गेम करणारे दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान ही मंडळी आता त्याच सूर्यवंशी व मगदूम यांच्या विजयासाठी पुढे होती. तर पराभवाला हातभार लावणारे दोन नगरसेवक यावेळी राष्ट्रवादीतून निवडून आले. पण त्यांच्या पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनीही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध केली. काल भाजप पाडण्यासाठी एकत्र आलेले आज भाजपच्या विजयात पुढे झाल्याने सांगली महापालिकेचे राजकारण पुन्हा ‘यू-टर्न’मुळे चर्चेत आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Corporation: Political U-turn; Rivals Unite for BJP Victory.

Web Summary : Sangli witnessed a political U-turn as rivals from the 2021 mayoral election joined forces with BJP for power. The same individuals who ousted BJP candidates previously now support their victory, highlighting shifting alliances in local politics.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस