शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: इस्लामपुरातील मजूर महिलेच्या खुनाचे गूढ कायम, संशयिताची चलाखी बनली डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 19:02 IST

गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या शिवनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या ६५ वर्षीय मजूर महिलेचा तोंडावर आणि डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. कापूरवाडी रस्त्यावरील ओढ्याकडेला निर्जनस्थळी हा प्रकार घडल्याने सायंकाळी या घटनेला वाचा फुटली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याने या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.हानिफाबी मदनसाब मुल्ला (वय ६५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा दावल मदनसाब मुल्ला (वय ४१) याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुनाचे कारण आणि संशयिताविषयी कोणतेही धागेदोरे लागत नसल्याने पोलिस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लागण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन गतीने तपास करण्याच्या सूचना दिल्या.मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीसोबत हानिफाबी मुल्ला या गेल्या होत्या. त्यांचा मुलगा दावल हा सेंट्रिंग कामावर गेला होता. सायंकाळी परतल्यावर आई घरी नसल्याचे समजताच त्यांनी शोधाशोध करायला सुरूवात केली. त्याचवेळी कापूरवाडी रस्त्यावरील नरसोबा मंदिराजवळ असलेल्या ओढ्यात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती तेथील शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अत्यंत निर्जनस्थळी महिलेचा मृतदेह पडला होता. मृतदेह बाहेर काढल्यानंतर तोंडावर आणि डोक्यावर कापीव जखमा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला.इकडे आईचा शोध घेणारा मुलगा दावल मुल्ला याला ही घटना समजताच त्याने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. तेथे आईचा मृतदेह पाहताच त्याने हंबरडा फोडला. रात्री उशिरा हानिफाबी मुल्ला यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.कष्टाळू महिला..हानिफाबी मुल्ला या अत्यंत कष्टाळू होत्या. शेतमजूर म्हणून काम करून आल्यानंतरही दुसरे काम आल्यास त्या ते काम करत होत्या. परिसरातील सर्वांशी त्या मिळून मिसळून राहायच्या. परिसरातील कोणतेही काम करण्यास त्या नेहमी तयार असायच्या. त्यांच्या खुनाची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दागिन्यांची हौस..हानिफाबी मुल्ला या कुटुंबासाठी खूप राबायच्या. त्यांचा मुलगा दावल हासुद्धा कष्टातून स्वत:चा सेंट्रिंग व्यवसाय उभारण्यापर्यंत यशस्वी झाला होता. तो आईला काम न करण्याबाबत सांगायचा. मात्र, हानिफाबी या कष्ट करायला मागे-पुढे पाहायच्या नाहीत. त्यांना दागिन्यांची मोठी हौस होती. त्यांच्या अंगावर भरभरून दागिने असायचे. त्याची परिसरात चर्चा होती.

पोलिसांनी तळ ठोकलाघटना घडल्यानंतर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भेट दिली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या पथकासह तळ ठोकला आहे. ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळावरून संशयिताचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. संशयितांचा माग काढण्यासाठी परिसरातील सी.सी.टी.व्ही. चित्रण तपासले जात आहे. निरीक्षक संजय हारूगडे व स्थानिक पोलिसही गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी झटत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस