Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:23 IST2025-09-23T15:23:14+5:302025-09-23T15:23:38+5:30
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील डॉ.जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरातून चोरट्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एक कोटी वीस हजार रुपये रुपयांचा ऐवज लुटला होता. ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनेचा मुख्य सूत्रधारास रविवार दि. २१ सप्टेंबररोजीं रात्री बाराच्या सुमारास ताब्यात घेतले.
महेशकुमार रघुनाथ शिंदे (वय ४७ वर्षे) रा.रूम नं. ८ जी ३, बर्वे नगर, म्युन्सिपल कॉलनी, घाटकोपर वेस्ट, मुंबई मुळ रा.कचरे सोसायटी जयसिंगपूर (ता.शिरोळ जि.कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. कवठेमहांकाळ पोलिस महेश याच्या मागावर होते. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या पथकाने अखेर महेश शिंदे याला अटक केली.
या कारवाईमध्ये पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक विनायक मसाळे, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलिस नाईक नागेश मासाळ, अभिजीत कासार, सिद्धेश्वर कुंभार यांनी सहभाग घेतला.
रविवारी रात्री बाराच्या सुमारास कारवाई
कवठेमहांकाळ शहरातील डॉ.जगन्नाथ मैत्री यांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून लूट केल्याप्रकरणी पोलिसांनी दीक्षा भोसले, पार्थ मोहिते, साई मोहिते, अक्षय लोहार, शकील पटेल यांना यापूर्वी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेशकुमार शिंदे यास पोलिसांनी रविवारी रात्री बाराच्या सुमारास अटक केली आहे, तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी आदित्य मोरे हा अद्याप फरार आहे.