सांगलीत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:15 IST2022-04-08T13:01:24+5:302022-04-08T13:15:59+5:30
चोरीचा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. यात एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार झाल्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

सांगलीत पोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट
सांगली : शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. रामचंद्र बिरणगे (वय ४६, रा. पोलीस लाईन, विश्रामबाग,सांगली) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गेल्या आठवड्यात बिरणगे यांच्या घरात चोरी झाली होती. चोरीचा प्रकार झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने संजयनगर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. यात एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा प्रकार झाल्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिरणगे यांनी घरीच आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी आत्महत्येचा हा प्रकार समोर आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.