शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

पाठीला कॅन बांधल्याने मुलगा वाचला, पण काळाने बापाला ओढलं; वारणा नदीपात्रातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:38 IST

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ऋषिकेश खामकर आपल्या आठ वर्षांच्या शंभूला व नातेवाईक असणाऱ्या कार्तिक प्रकाश खामकर (वय-१६) यांना घेऊन पोहायला घेऊन गेले होते.

मांगले (जि. सांगली) : वारणा नदीवरील मांगले - काखे पुलाखाली आठ वर्षांच्या मुलाला पोहायला घेऊन गेलेल्या बापाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. ऋषिकेश भीमराव खामकर (वय ३५) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ऋषिकेश खामकर आपल्या आठ वर्षांच्या शंभूला व नातेवाईक असणाऱ्या कार्तिक प्रकाश खामकर (वय-१६) यांना घेऊन पोहायला घेऊन गेले होते. मुलगा शंभूला पोहण्यास शिकवायचे होते. म्हणून ऋषिकेशने शंभूच्या पाठीला प्लास्टिक कॅन बांधून पोहायला वारणा नदीत सोडले होते. तर दुसरा नातेवाईक कार्तिक प्रकाश खामकर हा दहावीत आहे. त्याला पोहायला येत होते. 

त्याला पोहायला शिकवत असतानाच पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणारे जॅकवेल आहे. विद्युत पंपाचा पुरवठा खंडित झाल्यावर अचानक पुन्हा सुरू झाला. यादरम्यान पाण्याचा प्रवाह जॅकवेलच्या बाजूने जलद गतीने सुरू झाला. या प्रवाहाबरोबर ऋषिकेश पाण्यात घुटमळले व पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

यादरम्यान, काही लोकांनी धाव घेऊन ऋषिकेशला वाचवण्याचा प्रयत्न करून पाण्याबाहेर काढले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ऋषिकेश यांचा मुलगा शंभू पाठीला प्लास्टिकचा कॅन बांधल्यामुळे पाण्यावर नदीपात्रातच तरंगत होता. त्यालाही लोकांनी बाहेर काढले. ऋषिकेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी व लहान मुलगा असा परिवार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Father saves son, drowns in river; tragic incident unfolds.

Web Summary : A father drowned in the Warna River while teaching his son to swim. He had secured a plastic can to his son's back, saving him. A sudden surge from a water supply pump swept the father away despite rescue attempts.