शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या हिंदुत्वाच्या धास्तीने ठाकरे बंधू एकत्र येताहेत, मंत्री नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:22 IST

जतला लाल दिव्याची गाडी

उमदी : ज्यांनी-ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांची आजची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्र पाहत असून, आमच्या हिंदुत्वाची धास्ती घेत दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.उमदी येथे संजय तेली यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. राणे म्हणाले की, दोन ठाकरे बंधू हिंदुत्वासाठी वेगळे झाले नाहीत अथवा हिंदुत्वासाठी एकत्र येत नाहीत, तर ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येत आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच हिंदुत्वाचा ब्रँड आहे तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात आता पवार व ठाकरे उरले आहेत का? अजित पवार यांना पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर हिंदुत्वाच्या जवळ यावेच लागेल. ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची परिस्थिती आहे. गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा विचार पसरवत असून, जिहादी विरोधात स्पष्ट भूमिका मांडत आहेत.पडळकर म्हणाले की, उमदी येथे मंजूर झालेल्या औद्योगिक वसाहतीत एखादी मोठी कंपनी देऊन अनेक युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी राणे यांनी प्रयत्न करावेत. यावेळी राणे, पडळकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, डॉ. रवींद्र अरळी, आप्पू पट्टणशेट्टी यांनी संजय तेली यांचा सत्कार केला.

जतला लाल दिव्याची गाडीसंजय तेली म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदाचा व डॉ. रवींद्र अरळी यांना विधान परिषद सदस्यपदाचा उल्लेख केला. हाच धागा पकडत राणे यांनी लवकरच जतला लाल दिव्याची गाडी मिळेल असा विश्वास दिला.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेNitesh Raneनीतेश राणे Hindutvaहिंदुत्व