शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तेरापानी जुगार अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST

सांगली : शहरातील कर्नाळ चौकी ते बायपास रोडवरील एका इमारतीत सुरू असलेला १३ पानी जुगारअड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी ...

सांगली : शहरातील कर्नाळ चौकी ते बायपास रोडवरील एका इमारतीत सुरू असलेला १३ पानी जुगारअड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत २१ जणांना ताब्यात घेत रोख रकमेसह जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एक लाख ३२ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी जितेंद्र किसन पळसे (रा. जामवाडी, सांगली), अशोक साळुंखे (रा. चव्हाणवाडी, ता. वाळवा), रियाज काझी, फिरोज बागवान, इरफान बागवान (सर्व रा. शंभरफुटी रोड, सांगली), सुभाष माने (हरीपूर रोड, सांगली), अलताफ मुलाणी (गवळी गल्ली, सांगली), अनिल संकपाळ (रा. वानलेसवाडी), सूर्यप्रकाश धडके, समीर मुजावर (विजयनगर, सांगली), रमेश पवार (जामवाडी, सांगली), अबरार शेख (कर्नाळ रोड), दीपक डांबरे (चिंतामणीनगर, सांगली), मेहबूब सनदी (रा. ऐनापूर, ता. कागवाड), सरदार फकीर, महाबल मुंडे (रा. समडोळी), पिराजी ऐवळे (रा. बाज, ता. जत), दीपक शेरखाने, अनिल शेरखाने (दोघेही रा. इचलकरंजी), दीपक कांबळे (रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाळ रोडवर एका इमारतीमध्ये पथकाने छापा टाकला असता, २१ जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ६५ हजार ६५५ रुपयांच्या रोख रकमेसह मोबाइल, जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एक लाख ३२ हजार २५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. प्लास्टिक कॉइनद्वारे रकमा लावून हा जुगार खेळला जात होता.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, गजानन कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. पोलीस कर्मचारी विक्रांत ईश्वर माने यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

चौकट

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस पथकाच्या वतीने जिल्हाभर कारवाई सुरूच आहे. गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्याच्या पथकाला शहरातील कर्नाळ चौकी ते बायपास रोडवर एका वर्कशॉपजवळ असलेल्या इमारतीत जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.