शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू, ताकरी, म्हैसाळ योजना सौरऊर्जेवर चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:26 IST

सांगली : टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील ...

सांगली : टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना म्हैसाळच्या विस्तारित योजनेतून पाणी देण्यात येणार आहे. यासाठी मेच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलाविल्याचेही त्यांनी सांगितले.

विस्तारित जत सिंचन योजना आणि अपूर्ण टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेच्या प्रश्नावर सांगली पाटबंधारे कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत जलसंपदामंत्री पाटील बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता एम. जे. नाईक, उपअधीक्षक अभियंता अमर सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता अभिनंदन हारूगडे, सचिन पवार, सूर्यकांत नलवडे, कुमार पाटील, राजन डवरी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांच्या मोकळ्या जागेत आणि कालव्यावर सौरऊर्जेचा प्रकल्प उभारल्यास वीज खर्चात बचत होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करून मंत्रालयात पाठवावा, त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल. जत तालुक्‍यातील पूर्णतः वंचित ४८ गावे व अंशतः वंचित १७ गावांसाठी ८३८ कोटींची नवी विस्तारित योजना तयार केली आहे. विस्तारित जत उपसा सिंचन योजना नावाने प्रस्तावित योजनेसाठी मूळ म्हैसाळ योजनेतील टप्पा क्रमांक तीन (बेडग)मधून थेट पाणी उचलले जाणार आहे. त्यासाठी पाच टीएमसी राखीव पाण्याची तरतूद असेल. त्यातून ६५ गावांतील २० हजार २४३ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. योजनांच्या अपूर्ण कामांसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येईल.

क्षारपड जमिनीसंदर्भात कवठेपिरान, डिग्रज, बोरगाव, आष्टा, उरुण- इस्लामपूर या गावांचे सर्व्हे पूर्ण असून, प्रती हेक्टरी खर्च शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

चौकट

पाणीपट्टी वसुलीचे नियोजन करा

जयंत पाटील म्हणाले, सिंचन योजनांचे पाणी वाटप व पाणीपट्टी वसुलीबाबत योग्य नियोजन करावे. टंचाईच्या काळात पाणी देण्यासाठी त्याचा साठा करण्याबाबत नियोजन करावे. पाणीपट्टी वसुलीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास सिंचन योजना सुरळीत चालणे कठीण होणार आहे.