शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो, अगोदर मुलं प्रगत करा...!

By admin | Updated: July 10, 2016 00:59 IST

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत.

औरंगाबाद : शाळेच्या वेळेत गुरुजी मोबाईलवर खेळत बसतात की व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करतात, याच्याशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी दिवसभर काहीही करावे, मात्र वर्गातील मुलं प्रगत झाली पाहिजेत. ती शिकली पाहिजेत. आमची बांधिलकी गुरुजींसोबत नाही, ती मुलांसोबत आहे, अशी भूमिका राज्याचे शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी आज येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.ते म्हणाले की, गुरुजींनी शाळेच्या वेळेत व्हॉटस्अ‍ॅपवर चॅटिंग करावी की अन्य काही करावे, यासंबंधी आमची कसलीही हरकत नाही. बस्स, जिल्हा परिषद शाळांतील मुले प्रगत झाली पाहिजेत. हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संपूर्ण राज्यातील जि. प. शाळांतील मुले डिसेंबर २०१७ पर्यंत प्रगत झाली पाहिजेत, हा आमचा संकल्प आहे; परंतु औरंगाबादसह राज्यातील काही जिल्हा परिषद शिक्षकांचा विश्वास आहे की, आम्ही डिसेंबर २०१७ नव्हे, तर एक वर्ष अगोदरच (डिसेंबर २०१६) मुलं प्रगत करून दाखवू. शिक्षकांवर कोणत्याही गोष्टीची सक्ती करण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत शाळांतील मुलांना लिहिता येत नाही की वाचताही येत नाही, ही खाजगी शाळांमार्फत पसरविलेली अफवा आहे. ज्यामुळे जि. प. शाळांवर असलेला विश्वास उडेल व ती मुले खाजगी शाळेत येतील, या हेतूने पसरविलेली ती अफवा आहे, असेही नंदकुमार म्हणाले.सक्ती नाहीशिक्षकांवर ‘ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धत लादली जातेय’ याकडे नंदकुमार यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिक्षकांवर कोणतीही अध्यापन पद्धत लादलेली नाही.४ज्या अध्यापन पद्धतीमुळे मुले प्रगत होत असतील, ती पद्धत शिक्षकांनी अंगिकारावी. शिक्षकांना ‘ज्ञानरचनावाद’ ही शिक्षण पद्धत सक्तीची करण्यात आलेली नाही. शिक्षकांनी कोणती अध्यापन पद्धत अवलंबावी. तो शाळेत काय करतो. तो मुख्यालयी राहतो की नाही, यावर आमचा कोणताही आक्षेप नाही. ४मात्र, मुले शिकली पाहिजेत. जर ती शिकली नसतील, तर ती का शिकली नाहीत, याचा आम्ही जाब विचारू. यावर शिक्षकांनीच आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे सांगून शिक्षक संघटनांचे वाढते ‘फॅड’ किंवा शिक्षकांमध्ये वाढत चाललेल्या ‘पुढारपणा’बद्दल उत्तर देण्यास नंदकुमार यांनी पद्धशीरपणे बगल दिली.