शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: ..त्यामुळेच सत्ता गेली; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत रोहित पाटलांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:50 IST

आम्ही ताकदीने तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार

तासगाव : तासगाव शहरात झालेले बोगस मतदान, अमाप पैसा आणि किरकोळ बंडखोरी यामुळे आमची सत्ता गेली. मात्र, शहरातील जनता आमच्याच सोबत राहिली, असे आमदार रोहित पाटील यांनी तासगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यात स्वतंत्रपणे तुतारीच्या चिन्हावरच लढवणार असल्याचेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.आमदार रोहित पाटील म्हणाले, तासगाव शहरातील निवडणुकीत तब्बल १,४९१ बोगस मतदार होते. या निवडणुकीसाठी मांजर्डे, पेड, हातनोली, हातनूर, सांगली, सांगलीवाडी या ठिकाणांहून मतदार आणून ९५० बोगस मतदान करण्यात आले. बंडखोर उमेदवार, क्रॉस व्होटिंग आणि धनशक्तीच्या वापरामुळे त्याचा फटका आम्हाला बसला आणि आमचा पराभव झाला. अत्यंत साध्या घरातील उमेदवार आम्ही उभे केले, तरीही आम्ही पराभव प्रामाणिकपणे स्वीकारला आहे.ते पुढे म्हणाले, आघाडीत चर्चा झाली होती की तुतारी आणि घड्याळ एकत्र येत आहेत. अशा वावड्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला. विधानसभेत तुतारी आणि घड्याळ प्रत्यक्षात आमने–सामने आहेत. त्यामुळे या दोन चिन्हांची एकत्र लढत कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. आम्ही या भावना नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या आणि नेतृत्वाने आम्हाला तुतारी चिन्हावर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय दिला आहे. आम्ही ताकदीने तासगाव–कवठेमहांकाळ तालुक्यातील निवडणुका लढवणार आहोत. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, बाजार समितीचे माजी सभापती अविनाश पाटील, सभापती युवराज पाटील, तसेच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Patil blames bogus voting for power loss in Sangli.

Web Summary : Rohit Patil attributes Sangli's power loss to bogus voting, money, and rebellion. He affirmed that Zilla Parishad and Panchayat Samiti elections will be fought independently on the 'Tutari' symbol in Tasgaon-Kavathemahankal talukas. An alliance with 'clock' symbol was rejected by party workers.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६SangliसांगलीPoliticsराजकारणRohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार