शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांच्या चक्रव्यूहात तासगाव-कवठेमहांकाळ

By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST

आबांच्या निधनाने राजकीय पोकळी : मतदारसंघाच्या प्रगतीसाठी इच्छाशक्तीची गरज

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ  -ओसाड आणि उजाड माळरान, उद्विग्न शेतकरी, सर्वांगीण विकासाला बसलेली खीळ, थकबाकी आणि वसुलीच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकीय हिशेबात अडकलेली म्हैसाळ योजना, राजकीय पाटात मुरत असलेले म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी, आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने निर्माण झालेली राजकीय पोकळी, अर्ध्यावर अडकलेली विकासाची कामे, वीज आणि आरोग्याचे वाढते प्रश्न... अशा विविध प्रश्नांच्या चक्रव्यूहात तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ सापडला आहे. वर्षानुवर्षे कवठेमहांकाळ तालुका दुष्काळाच्या आगीत होरपळत होता. त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विठ्ठलदाजी पाटील यांना सोबत घेत म्हैसाळ योजना जन्मास घातली. या योजनेस नानासाहेब सगरे, शिवाजीराव शेंडगे, अजितराव घोरपडे, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उभारी दिली. आर. आर. पाटील यांनी दुष्काळी शिवाराचे नंदनवन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने कायमस्वरूपी तहान भागविली. अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे नेली. हजारो कोटींचा निधी या योजनेसाठी आणला. शेतीला बारमाही पाणी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी व वीजबिल आघाडी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीतूनच भरले, परंतु, १६ फेबु्रवारीला झालेल्या आर. आर. पाटील आबांच्या अकाली निधनाने दुष्काळी टापूच्या विकासाला मोठी खीळ बसली आहे. या भागात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, सिंचन योजनेची अपूर्ण कामे अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मतदारसंघाला आबांच्या विचाराचे नेतृत्व मिळेलही, परंतु या नेतृत्वाला राजकारणाची व समाजकारणाची मर्यादा असेल. आबांसारखा राजकारणातील मोठा पल्ला गाठण्यासाठी खूप वर्षे लोटतील. तोपर्यंत हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर खूप मागे पडलेला असेल, असे जाणकार सांगतात. राज्यपातळीवरील विकासवादी नेतृत्वाची उणीव या मतदारसंघाला जाणवू लागली आहे.मतदारसंघातील राष्ट्रवादीसह आबांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची मने खचलेली आहेत. या कार्यकर्त्यांना व नेत्यांना धीर व आधार देण्याचा, बळ देण्याचा प्रश्नही राष्ट्रवादी पक्षापुढे निर्माण झाला आहे.
आबांच्या जाण्यामुळे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहेत. शिवाय पाणी, रस्त्यांचा प्रश्न, आरोग्याचे व विजेचे प्रश्न, प्रशासकीय पातळीवर कामात होणारी ससेहोलपट अशा अनेक समस्यांच्या गर्तेत, चक्रव्यूहात मतदारसंघ तसेच कवठेमहांकाळ
तालुका अडकला आहे. या प्रश्नांचा चक्रव्यूह सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला संघर्ष तर करावा
लागणार आहेच, शिवाय मतदारसंघाची प्रगती होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही पणाला लावावी लागणार आहे.


मतदारसंघात राष्ट्रवादीला मरगळ
आबांचा राजकीय दबदबा असल्यामुळे प्रशासकीय पातळीवरील अनेक कामे लिलया केली जात होती. परंतु, आता हा प्रशासनावरील दबदबाही नाहीसा झाला आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रशासकीय पातळीवरील कामे रखडली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना तालुकास्तरावरील शासकीय कामे करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही तालुका पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे मतदारसंघात पक्षाला व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आलेली मरगळ झटकून देऊन कामास लावण्याचे आव्हान राष्ट्रवादीतील नेतृत्वाला पेलावे लागणार आहे. आबांनी मतदारसंघात मंजूर केलेली प्रशासकीय इमारत, रस्ते, सिंचन योजनेची व विजेची कामे, ढालगाव भागासाठी सुरू करण्यास सांगितलेली टेंभू योजनेची कामे अशी अनेक कामे मतदारसंघात धिम्या गतीने सुरू आहेत, रखडलेली आहेत. ती तातडीने पूर्ण करणेही आवश्यक आहे.