शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

तासगावच्या पटावर रंगला तिरंगी सामना

By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST

नवे डाव : दोन्ही तालुक्यात समीकरणे बदलली

दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे अशा दुहेरी पटावरच राजकीय समीकरणांचा डाव रंगत होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर संजयकाका आणि घोरपडे यांच्यातील दरी वाढत गेली. सांगली बाजार समितीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे या मतदारसंघाच्या राजकारणाचा त्रिकोणी पट तयार झाला आहे. या पटावर सत्ता गाजवण्यासाठी राष्ट्रवादीच्या गटाबरोबरच आता खासदार आणि सरकार गटातही शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपल्याचे चित्र आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कल वगळून तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याचा एक मतदारसंघ झाला. तासगाव तालुक्यात आर. आर. पाटील आणि संजयकाका पाटील असे दोन तुल्यबळ गट होते, तर कवठेमहांकाळ तालुक्यात अजितराव घोरपडे यांचा मोठा गट होता. तसेच सगरे आणि शेंडगे घराण्याचेही बालेकिल्ले मजबूत होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आर. आर. पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडे विरोधकांशी जुळवून घेत कवठेमहांकाळ तालुक्यात स्वत:चा गट तयार केला. मात्र संजयकाकांना कवठेमहांकाळमध्ये, तर घोरपडेंना तासगावमध्ये स्वत:चा गट तयार करण्यात अपयश आले. त्यामुळे या दोन नेत्यांनी जवळीक साधत आर. आर. पाटील यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. संजयकाकांपाठोपाठ अजितराव घोरपडेंनी भाजपमध्ये प्रवेश केला व तालुक्यातील राजकीय समीकरणात बदल झाला. आर. आर. यांच्याविरोधात या नेत्यांनी एकत्रित येऊन विधानसभेच्या पटावर आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये अपयश आले. या अपयशानंतर खासदार आणि सरकार यांच्यात एक अस्पष्ट दरी निर्माण झाली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही त्यांच्यातील मतभेद उघड झाले. सांगली बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने घोरपडे यांनी संजयकाकांशी फारकत घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावर आमदार सुमनताई पाटील, खासदार पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या राजकारणाचा त्रिकोण पाहायला मिळणार, हे स्पष्ट झाले आहे.