शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांवर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST

फोटो : २३ कुपवाड १ -जखमी साहेबराव पुजारी कुपवाड : शहरातील बजरंगनगर येथील साहेबराव दगडू पुजारी या सेवानिवृत्त कंत्राटी ...

फोटो : २३ कुपवाड १ -जखमी साहेबराव पुजारी

कुपवाड : शहरातील बजरंगनगर येथील साहेबराव दगडू पुजारी या सेवानिवृत्त कंत्राटी महापालिका कर्मचाऱ्यांवर अज्ञाताकडून तलवार हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यावर व हातावर चार वार झाले आहेत. या घटनेची अद्याप कुपवाड पोलिसांत नोंद झालेली नाही.

याबाबत जखमीच्या नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, जखमी साहेबराव पुजारी हे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी आहेत. गुरुवारी सायंकाळी पुजारी घरात वाफ घेत बसले होते. यावेळी अज्ञात इसम तोंडावर रूमाल बांधून हातात धारदार तलवार घेऊन आला. त्याने प्रथम पुजारी यांच्या डोक्यावर पाठीमागील बाजूस दोन वार केले तसेच हल्ला चुकताना डाव्या हातावरही दोन वार झाले आहेत. हल्ला झाल्यावर पुजारी यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोर दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकलीवरून पसार झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पुजारी यांना सांगलीतील वसंतदादा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीच्या डोक्यात व हातावर गंभीर स्वरूपाचे चार वार झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेची नोंद अद्यापही कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली नाही. तलवार हल्ल्याच्या घटनेने शहर परिसरात खळबळ माजली आहे. मात्र, हल्ला झाल्याचे कारण समजू शकले नसल्याची माहिती मिळाली आहे.