सांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:08 IST2021-05-06T11:59:37+5:302021-05-06T12:08:18+5:30
Crimenews Jail Sangli : सांगली येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे.

सांगली कारागृहात कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या
सांगली : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या एका आरोपीने बाथरूममधील ॲगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक आवळे (रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) असे त्याचे नाव असून बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची शहर पोलिसात नोंद आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो कारागृहात होता. मंगळवारी रात्री बाथरूममध्ये गेला व तिथे टॉवेलच्या सहाय्याने त्याने आत्महत्या केली. कारागृह प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.
काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या कुटूंबियांना व मित्रांना उद्देशून लिहलेल्या चिठ्ठीत कोणीही गुन्हा करू नका, कारागृहातील दिवस वाईट असतात. कारागृहातून बाहेर आल्यानंतर सुधारयची इच्छा असून त्यासाठी काही दिवस सांगलीबाहेरही जायची तयारी असल्याचे त्याने म्हटले होते. तरीही त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.