जत : पाणी उडविल्याचा राग मनात धरून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याबद्दल जत पोलिस ठाण्यात एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी येथील रामराव विद्यामंदिरसमोर घडली.याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील महादेव विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सोमवारी भूमितीचा पेपर देण्यासाठी श्री रामराव विद्यामंदिरात आला होता. पेपर सुरू होण्यापूर्वी पाणी पिऊन ग्लास ठेवत असताना शेजारी उभा असलेल्या श्री रामराव विद्यामंदिरमधील पेपर द्यायला आलेल्या मुलावर पाण्याचे शिंतोडे उडाले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. परीक्षा झाल्यावर तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली होती.परीक्षा संपल्यानंतर सदरचा मुलगा गावी जाण्यासाठी स्कूल बसमध्ये बसला होता. त्यावेळी माझ्या अंगावर पाणी टोकतोस काय, म्हणून लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात रॉडने जोराने प्रहार केल्याने मुलगा गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Summary : In Sangli, a tenth-grade student was attacked with an iron rod after accidentally splashing water on another student before an exam. The victim suffered serious head injuries and is hospitalized. Police have registered a case against the minor assailant.
Web Summary : सांगली में, परीक्षा से पहले पानी छिड़कने पर एक दसवीं के छात्र पर लोहे की रॉड से हमला किया गया। पीड़ित के सिर में गंभीर चोटें आई हैं और उसे अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस ने नाबालिग हमलावर के खिलाफ मामला दर्ज किया है।