एसटीचा प्रवास पुन्हा सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:11+5:302021-06-09T04:34:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे एसटी बसेस सेवाही सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यात ...

ST's journey resumed smoothly | एसटीचा प्रवास पुन्हा सुरळीत सुरू

एसटीचा प्रवास पुन्हा सुरळीत सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यामुळे एसटी बसेस सेवाही सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यात एसटीच्या ७१ बसेसच्या फेऱ्या सुरळीत सुरू झाल्या असून, दोन लाखापर्यंत उत्पन्नही मिळाले आहे. मंगळवारपासून सांगली, मिरज बसस्थानकातून स्वारगेट (पुणे) येथे आठ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत.

गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात कमी झाली आहे. यामुळे सोमवारपासून जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधारी यांनी लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केले आहे. यामुळे एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. सोमवारी प्रवासीही वाढले आहेत. बसेसच्या ७१ फेऱ्या झाल्या असून, १४ हजार ६६३ किलो मीटरपर्यंत बस धावल्या आहेत. यापासून दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. मंगळवारपासून सांगली ते कोल्हापूर, सांगली ते इचलकरंजी दर तासाला बसे सोडण्यात येणार आहे. तसेच सांगली ते स्वारगेट चार आणि मिरज ते स्वारगेट चार अशा आठ फेऱ्या पुण्याला होणार आहेत. सांगली ते पिंपरी-चिंचवड या मार्गावरही एक बस धावणार आहे. सांगली ते सातारा या मार्गावर पाच फेऱ्या होणार आहेत. येत्या आठवड्यात एसटीच्या सर्व बसेसच्या फेऱ्या सुरळीत सुरू होतील, असा एसटी प्रशासनाने दावा केला आहे.

चौकट

प्रवाशांची काळजी घेऊन बससेवा सुरू

प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन केले जात आहे. प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने प्रवास करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करावे. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने आणि एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सांगली विभागाचे प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.

Web Title: ST's journey resumed smoothly