शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

पोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:59 AM

सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचे आरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाºयांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या अंगात बळ, पण छातीत कळ!विश्रांती कमी मिळत असल्यानेही आरोग्यावर परिणाम

शरद जाधव सांगली : सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी दिवस-रात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांचेआरोग्य मात्र बिघडत चालले आहे. सलग आणि तणावपूर्ण वातावरणात काम, तास न् तास उभे राहून सुरू असलेल्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना हृदयविकारासह अन्य आजार जडले आहेत. पोलिसांची मानसिकता चांगली राहावी, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात असले तरी, कामाचा वाढता ताण कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतला, तर जिल्ह्यातील पोलीस दल थोडा वेळ सोडला, तर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या बंदोबस्तावर तैनात आहेच. एप्रिल महिन्यातील लोकसभा निवडणूक, त्यानंतर थोड्याच कालावधित महापूर, लगोलग विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस सलग पोलीस बंदोबस्तात कायम आहेत. ऊन, पावसाची तमा न बाळगता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दल कार्यरत आहे.या सलगच्या ड्युटीमुळेच पोलिसांना हृदयविकाराचा मोठा त्रास जाणवत आहे. अनेकवेळा बंदोबस्तासाठी तास न् तास उभे राहावे लागत असल्याने, पायाला सूज, टाचा दुखण्यासह मणक्याचेही विकार जडले आहेत. त्यातच रात्री-अपरात्रीच्या ड्युटीमुळे विश्रांती कमी मिळत असल्यानेही पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.पोलीस दलातील नवीन कर्मचारी व अधिकारी आपल्या आरोग्याबाबत सजग असले तरी, सेवेत काही वर्षे रुळलेल्या कर्मचाऱ्यांना कामाचा वाढता ताण व अन्य कारणामुळे व्याधींना सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांसाठी परेडसह इतर उपाययोजना करण्यात येत असल्या तरी, वाढत्या कामामुळे त्यात कर्मचाऱ्यांना सहभागी होता येत नसल्याचे चित्र आहे.

आरोग्य चांगले राहावे व त्यांना आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी पोलीस दलातर्फे आरोग्य शिबिरांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात येते. मात्र, केवळ मार्गदर्शनाने थोड्या कालावधीकरिता कर्मचाऱ्यांत सजगता निर्माण होत असली तरी, त्यानंतर ती सजगता कायम राहत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगलीHealthआरोग्य