खरसुंडीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:28+5:302021-04-11T04:25:28+5:30

खरसुंडी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खरसुंडी येथील ...

Spontaneous response to scratch lockdown | खरसुंडीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

खरसुंडीत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद

खरसुंडी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर खरसुंडी येथील ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतल्याने शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बाजारपेठेतील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवली. गावामधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामान्य जनतेनेही घरीच राहणे पसंत केले. गर्दीने नेहमीच गजबजणाऱ्या चौकात दिवसभर पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाने लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्स यांचे पालन करून तोंडाला मास्क लावा, असे आवाहन वेळोवेळी केले. बस स्थानक, ग्रामपंचायत परिसरातील दुकाने, मंदिर परिसरातील दुकाने, जोगेश्वरी चौक या ठिकाणी व्यापारी व दुकानदारांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद दर्शविला.

Web Title: Spontaneous response to scratch lockdown