‘सोनहिरा’ला उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:17+5:302021-02-05T07:29:17+5:30

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास सन २०१९-२० या गळीत हंगामासाठी ...

'Sonhira' gets Best Sugarcane Development Award | ‘सोनहिरा’ला उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर

‘सोनहिरा’ला उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास सन २०१९-२० या गळीत हंगामासाठी उत्कृष्ट ऊस विकास (उच्चतम साखर उतारा विभाग) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नवी दिल्लीच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून जाहीर झाला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, कारखान्याने शेती विभागांतर्गत स्वतंत्र ऊस विकास विभागामार्फत गेली अनेक वर्षांपासून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. ऊसतोडणी प्रोग्रॅमनुसार उच्चतम प्रतिच्या उसाची तोडमुळे साखर उतारा चांगला मिळत आहे. ऊस उत्पादकांसाठी ठिबक सिंचन, कारखान्याची स्वत:ची माती-पाणी परीक्षण फिरती प्रयोगशाळा, ऊस रोपे व बियाणे वाटप, उती संवर्धित रोपांचा पुरवठा, खत व औषध पुरविठ्यासाठी डेपो सेल सेंटर, ५० टक्के कारखाना अनुदानावर ताग बियाणे वाटप, हुमणी कीड नियंत्रण आदी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. हा राष्ट्रीय पुरस्कार गुजरातमधील वडोदरा येथे मार्चमध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

फोटो - २८मोहनराव कदम

Web Title: 'Sonhira' gets Best Sugarcane Development Award