पाण्याच्या टी मधून निघाले सहा धीवड जातीचे साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:03 PM2020-12-26T17:03:22+5:302020-12-26T17:06:39+5:30

snake Sangli- आमणापूर ता.पलूस येथे ऊसाला पाणी पाजण्यासाठी टी.खुली केली असता त्यामधून धीवड जातीचे सहा भले मोठे साप निघाले.यामुळे शेतकऱ्याची पुरती भंबेरी उडाली. येळावी-आमणापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडला आहे.

Six Dhiwad snakes came out of the water | पाण्याच्या टी मधून निघाले सहा धीवड जातीचे साप

पाण्याच्या टी मधून निघाले सहा धीवड जातीचे साप

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्याच्या टी मधून निघाले सहा धीवड जातीचे सापयेळावी-आमणापूर रोडवरील एका शेतातील प्रकार

भिलवडी- आमणापूर ता.पलूस येथे ऊसाला पाणी पाजण्यासाठी टी.खुली केली असता त्यामधून धीवड जातीचे सहा भले मोठे साप निघाले.यामुळे शेतकऱ्याची पुरती भंबेरी उडाली. येळावी-आमणापूर रोडवरील एका शेतात हा प्रकार घडला आहे.

एका शेतकऱ्याने लागण तुटल्यावर एका खोडवा ऊसाला पाणी पाणी सुरू केले. टी सुरू करून दारे धरले, आणि पुन्हा पाणी कसे निघते बघण्यासाठी टी कडे वळला. गढूळ पाण्याबरोबर या टी मधून एका पाठोपाठ एक असे सहा साप निघाले. ते तांबूस करड्या रंगाचे हे साप बघताच शेतकऱ्याची पुरती भंबेरी उडाली. मात्र काही क्षणातच हे सर्व साप मृत असल्याचे लक्षात आहे.

या बाबत वन्यजीवप्रेमी आदम सुतार यांना विचारले असता, हे धीवड जातीचे साप असून त्याला स्थानिक भाषेत यिरूळा म्हणतात.हा साप बिन विषारी असून २.५.ते ३ फुटा पर्यंत लांबी असते. त्यांचे पाण्यात व जमिनीवर वास्तव असते. मासे, बेडूक हे त्यांचे अन्न आहे. 

Web Title: Six Dhiwad snakes came out of the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.