शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी, दिघंची येथील सहा घरफोड्यांचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

सांगली : आटपाडी तालुक्यात विविध सहा ठिकाणी टाकण्यात आलेल्या दरोडा, घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ...

सांगली : आटपाडी तालुक्यात विविध सहा ठिकाणी टाकण्यात आलेल्या दरोडा, घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. या प्रकरणी देवगण उर्फ देव्या बापू पवार (वय १९, रा. सरकारी दवाखान्यामागे, आटपाडी) यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून दोन लाख ८९ हजार ६८० रुपये किमतीची सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील चोरी, घरफोड्यांसह अन्य गुन्ह्यांत हवे असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक आटपाडी शहरात गस्तीवर होते. या वेळी शहरातील बायपास रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलसमोर एक तरुण चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने देव्या पवारला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे दोन लाख ८९ हजार ६८० रुपयांचे दागिने मिळून आले.

याबाबत अधिक चौकशी केली असता, आटपाडी व दिघंची येथे बंद घरावर पाळत ठेवून रात्रीच्या वेळी कुलूप तोडून घरफोडी केल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार दिघंची येथील आदिती ज्वेलर्स हे सराफी दुकान, आटपाडीतील आबानगर चौकातील वसंत विष्णू जाधव यांचे घर, आटपाडी न्यायालयासमोर असलेले मनीषा उत्तम सरगर यांचे घर, दिघंची येथील अरुणा अनिल वेदपाठक, विद्यानगर आटपाडी येथील शोभा मल्लाप्पा राचगोंड यांचे घर आणि आटपाडीतील भारत पांडुरंग ठेंगले यांचे घर फोडून ऐवज लांबविल्याचे तपासात स्पष्ट झाले.

आटपाडी पोलीस ठाण्यात या सर्व गुन्ह्यांची नाेंद असल्याने एलसीबीच्या पथकाने पुढील तपासासाठी त्यास आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयित पवारकडून मंगळसूत्र, सोन्याचे बदाम, अंगठ्या, चांदीचे छल्ले, सोन्याची चेन, देवाची मूर्ती आदी ऐवज जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संदीप गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

चौकट

सोलापूर जिल्ह्यातही गुन्हे

या गुन्ह्यात अटकेत असलेल्या देवगण पवार व त्याच्या ७ साथीदारांनी सोलापूर जिल्ह्यातही गुन्हे केले आहेत. १९ जानेवारी रोजी पिलीव घाटात एसटी बस लुटण्याच्या उद्देशाने एसटीवर दगडफेक करण्यात आली होती. या गुन्ह्यात आटपाडीतून चोरलेल्या दुचाकीचा वापर करण्यात आला होता.