कापूसखेडच्या कुस्ती स्पर्धेत अनिकेत खबालेला चांदीची गदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:04+5:302021-02-05T07:28:04+5:30

इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे जयहनुमान तालीम मंडळ आणि कुस्ती मल्ल विद्या यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅटवरील ...

Silver mace thrown by Aniket in Kapuskhed wrestling competition | कापूसखेडच्या कुस्ती स्पर्धेत अनिकेत खबालेला चांदीची गदा

कापूसखेडच्या कुस्ती स्पर्धेत अनिकेत खबालेला चांदीची गदा

इस्लामपूर : कापूसखेड (ता. वाळवा) येथे जयहनुमान तालीम मंडळ आणि कुस्ती मल्ल विद्या यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत ७६ किलो वजनी गटात खेडच्या अनिकेत खबालेने अतुल नायकल याचा पराभव करत मानाची चांदीची गदा पटकाविली.

माजी सरपंच प्रदीप पाटील, उद्योजक भय्या पाटील, जयदीप पाटील, दिलीप जाधव, अभिजित पाटील, विरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पै. खबाले यांना चांदीची गदा देण्यात आली. ६० किलो गटातून रोहित तामखडे, अजय केसरे, अक्षय पाटील हे विजेते ठरले.

५२ किलो गटात नितीन घुबडे, प्रतीक पाटील, प्रशांत माने, ४५ किलो वजनगटात तुषार साळुंखे, परम माळी, विराज चव्हाण, १४ वर्षाखालील ३८ किलो वजनी गटात हर्षद पाटील, गणेश कोळेकर यांनी तर ३२ किलो वजन गटातून अथर्व पाटील, आर्यन माळी, चेतन खोत यांनी यश मिळविले. या सर्वांना रोख रक्कम व मानचिन्ह असे बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेसाठी प्रा. डॉ. नितीन शिंदे, तानाजी केसरे, संजय पाटील, अभिजित माने, दत्ता गायकवाड, प्रवीण शिंदे, माणिक पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. पै. सुरेश जाधव-चिंचोलीकर यांनी निवेदन केले. अनिल जाधव, नितीन नायकवडी, सलमान मुल्ला, प्रशांत यादव, मृणाल माळी यांनी संयोजन केले.

फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर कुस्ती न्यूज

कापूसखेड येथील कुस्ती स्पर्धेतील विजेत्या अनिकेत खबाले यांना माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्याहस्ते चांदीची गदा देण्यात आली. यावेळी भय्या पाटील, जयदीप पाटील, दिलीप जाधव, अभिजित पाटील, विरसिंह पाटील उपस्थित होते.

Web Title: Silver mace thrown by Aniket in Kapuskhed wrestling competition