शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

...तर मिरज मतदारसंघावरही शिवसेनेचा प्रबळ दावा

By admin | Updated: September 11, 2014 23:08 IST

अदलाबदलीची चर्चा : मिरज, सांगलीसाठी नेत्यांनी लावली जोरदार ‘फिल्डिंग’; भाजप कार्यकर्त्यांत संभ्रम

सांगली : जिल्ह्यातील शिवसेनेकडे असलेले परंपरागत मतदारसंघ खेचण्यासाठी एकीकडे भाजपने ‘फिल्डिंग’ लावली असली तरी, अशा जागांच्या बदल्यात भाजपच्या काही महत्त्वाच्या जागांसाठी शिवसेना नेते आग्रही झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेना मिरजेसाठी सर्वाधिक आग्रही आहे. त्यासाठी शिवसेनेने मिरजेतील मागील निवडणुकांमधील सेनेच्या कामगिरीचे दाखलेही महायुतीच्या नेत्यांकडे दिले आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच जागांसाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामध्ये सुरुवातीला सांगली आणि मिरज मतदारसंघांचा समावेश नव्हता. तेथे भाजपचे आमदार आहेत. भाजपने या तीन जागांशिवाय तासगाव-कवठेमहांकाळ आणि पलूस-कडेगावसाठी आग्रह धरला आहे. खासदार संजय पाटील यांनी त्यांचे मित्र माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत तासगाव-कवठेमहांकाळची जागा भाजपकडे घ्यायची आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करून राजकीय ताकद दाखविण्यासाठी ते सरसावले आहेत. अशावेळी संजय पाटील यांच्या आग्रहास्तव अन्य एखादी जागा सेनेला देण्याचाही विचार आता भाजपचे वरिष्ठ नेते करीत आहेत. सांगलीच्या जागेवर दावा करून सेनेला येथे चांगला उमेदवार देणे जिकीरीचे बनले आहे. याउलट मिरज मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असून यापूर्वी मिरजेतून अनेक निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार लढत दिली आहे. बजरंग पाटील यांनी शिवसेनेकडून लढताना मिरज मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यांनी दोनवेळा सेनेची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे सांगलीपेक्षा शिवसेना मिरजेलाच अधिक पसंती देत आहे. पर्याय म्हणून यापूर्वीच शिवसेनेच्या नेत्यांनी या दोन्ही जागांसाठी आग्रह धरला होता. आता वरिष्ठ पातळीवर सेनानेते मिरजेला अधिक पसंती देत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ पाहिजे असेल तर मिरज, सांगली किंवा जतपैकी एक मतदारसंघ आम्हाला द्यावा, अशी मागणी सेना करत आहे. त्यातही पुन्हा मिरजेला अधिक पसंती आहे. जत आणि सांगलीत शिवसेनेला उमेदवार व कार्यकर्ते शोधावे लागणार आहेत. तशी परिस्थिती मिरजेत नाही. मिरज हाच मतदारसंघ शिवसेनेसाठी अधिक सुरक्षित आहे. एकूण परिस्थितीचा विचार केला, तर भाजपकडून तासगाव-कवठेमहांकाळसाठी अधिक ताकद लावली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)तासगाव-कवठेमहांकाळऐवजी आम्ही मिरज, सांगली व जत या तीन मतदारसंघांपैकी एक जागा मागितली आहे. मित्रपक्षांनाही काही जागा द्यायच्या असल्याने आम्ही यापूर्वीच जिल्ह्यात जादा जागांची मागणी केली होती. याविषयी आता लवकरच निर्णय होईल. - दिवाकर रावते, संपर्कप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र शिवसेनामिरजेलाच का पसंती?सांगली व जत विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना फारशी सक्रिय नाही. निष्क्रियतेमुळे संदीप सुतार यांची नुकतीच जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी झाली आहे. याउलट शिवसेनेचे प्राबल्य मिरजेत अधिक असल्यानेच जिल्हाप्रमुखपद मिरजेच्या विकास सूर्यवंशी यांना देण्यात आले. या तिन्ही मतदारसंघात मिरजेतच शिवसेनेचे दखल घेण्यासारखे अस्तित्व दिसून येते. त्यामुळेच मिरजेसाठी वरिष्ठ पातळीवर अधिक आग्रह दिसत आहे. लोकसभेचे गणितलोकसभा निवडणुकीत खा. संजय पाटील यांच्या प्रचारात संभाजी पवारांनी सहभाग घेतला नव्हता. जतचे आमदार प्रकाश शेंडगे आणि सुरेश खाडे यांचे तळ्यात-मळ्यात सुरू होते. त्यांच्यासह सांगलीतील काही स्थानिक नेत्यांना संजयकाकांनी फारसे सहभागी करून घेतले नव्हते. मिरजेतून अपेक्षित आघाडी मिळवून देण्यात खाडे यांचा सहभाग नव्हता. संजयकाकांना मिरजेतून आघाडी मिळाली, ती राष्ट्रवादीच्या छुप्या मदतीवर! मिरज पूर्व भागात अजितराव घोरपडेंचा गट अजूनही प्रबळ आहे. मात्र त्यांचेही खाडेंशी सख्य नाही. त्यामुळे सांगली, मिरजेपैकी एक जागा देण्यासाठी खा. संजय पाटील किंवा भाजपचे अन्य नेते फार विचार करतील, असे वाटत नाही.