शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटण्यास सर्वस्वी शिवसेनाच जबाबदार

By admin | Updated: October 12, 2014 00:53 IST

उमा भारती : खानापूर येथे प्रचार सभा, शिवसेनेवर हल्लाबोल

खानापूर : राष्ट्रवादीचे पैशावर, कॉँग्रेसचे भ्रष्टाचारावर, तर शिवसेनेचे राजकारण धमकीवर चालते. अशा राजकारणाला भाजपचा प्रखर विरोध आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती आम्ही तोडली नाही. तसे असते तर अजून शिवसेनेचे अनंत गीते केंद्र सरकारमध्ये राहिले नसते. त्यामुळे महाराष्ट्रात सेना-भाजपची युती तुटण्यास शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी आज (शनिवारी) खानापूर येथे केला. उमा भारती म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे हे माझ्या वडिलांसमान होते. त्यांच्या कुटुंबाबद्दल मला आदर आहे. परंतु, युती तुटण्यास भाजप कारणीभूत नसून, शिवसेनाच कारणीभूत आहे. वाजपेयी, अडवाणी हे जिथे वाद असेल व प्रश्न अवघड असेल तेथे मला पाठवत. मी माझी जबाबदारी यशस्वी पार पाडत होते. त्यामुळे मला ‘फायर ब्रॅण्ड’ म्हणून ओळखले जाते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी मला जलसंधारण मंत्रालय दिले. त्यामुळे मी ‘वॉटर ब्रॅण्ड’ बनले. यापूर्वी जलसंधारणाची कामे राज्य शासन करीत होते. यात दिरंगाई होत आहे. कामे अपुरी रहात आहेत. हे केंद्राच्या लक्षात येत असून, अपुरी कामे पूर्ण करण्यास केंद्र विशेष उपाययोजना करणार आहे. यामध्ये टेंभू योजनेचा प्रश्न सोडविण्यात येईल. या योजनांना केंद्र पैसे देणार, परंतु त्याचा हिशेबही घेणार आहे. अग्रणीसारख्या हंगामी नद्या बारमाही करण्याचा उपक्रम भाजप राबवेल. खा. संजय पाटील म्हणाले की, आतून एक आणि बाहेरून एक या संस्कृतीचा मी कार्यकर्ता नाही. विसापूर सर्कलमधील २१ गावांतील ५० टक्के मते मी भाजपला देणार असल्याचे दाखविणार आहे. टेंभूच्या नावाने २० वर्षे मते मागितली. परंतु, आघाडी शासनास योजना पूर्ण करता आली नाही. यावेळी रमेश शेंडगे, गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, बंडोपंत देशमुख, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गणेश देसाई, सौ. शुभांगी सुर्वे, अनिल म. बाबर, दिलीप आमणे उपस्थित होते. (वार्ताहर)