शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेते शेखर माने राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक शेखर माने यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश कार्यक्रम पार पडला. या प्रवेशामुळे शिवसेनेला सांगलीत धक्का बसला आहे.

माने यांनी यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीत दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. महापालिकेत दोन वेळा ते नगरसेवक होते. सांगलीतील उपमहापौर गटाचे नेते म्हणून त्यांनी काम केले. या काळात पक्षाविना त्यांनी दबावगट स्थापन करून महापालिकेच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. महापालिकेच्या स्थापनेपासून सांगलीच्या राजकारणात, समाजकारणात माने यांनी स्वतंत्र छाप पाडली. महापूर, कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मदत केली होती. शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी आंदोलनेही केली आहेत. सध्या व्यापारी संघटनेचे नेतृत्वही त्यांच्याकडे आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ते शिवसेनेचे नेते म्हणून कार्यरत होते. सांगली शहरातील अनेक युवा मंडळांचे नेतृत्व ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीत जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यासोबत शहरातील अनेक मंडळांचे युवक व शिवसेनेतील मोठा गटही आता राष्ट्रवादीशी जोडला जाणार आहे.

चैाकट

जयंत पाटील यांच्याकडून कौतुक

जयंत पाटील यांनी प्रवेशावेळी माने यांच्या महापौर, उपमहापौर निवडीतील योगदानाचे कौतुक केले. माने यांच्यासारख्या समाजकारण्यांमुळे पक्षसंघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोट

शहराच्या विकासासाठी आजवर आम्ही राबलो. आताही पक्षप्रवेशामागे शहरविकासाचा उद्देश आहे. शिवसेनेतही कोणत्याही पदाविना मी कार्यरत राहिलो. तिथेही अपेक्षा केली नाही. राष्ट्रवादीतही शहरासाठी आवश्यक असलेली कामे व्हावीत, हीच अपेक्षा घेऊन आलो आहे.

- शेखर माने, नेते, राष्ट्रवादी