शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

शिंदे गट-शिवसेनेतील वाद पेटला, इस्लामपुरात सेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 18:53 IST

लोखंडी रॉडने दोन्ही पाय आणि एक हात मोडला

श्रीनिवास नागेइस्लामपूर : येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रतिभा शिंदे यांच्या पतीवरच शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या कार्यकर्त्यांनी लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. हा प्रकार आज, सोमवारी सकाळच्या सुमारास झाला. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, शिंदे गटात सामील का होत नाही या राजकीय मतभेदातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता चर्चेत होती.शिवकुमार दिनकर शिंदे (४९, रा. हनुमान नगर, इस्लामपूर) असे जखमीचे नाव आहे. ते सेंटरिंग व्यावसायिक आहेत. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडेसह इतर ६ अनोळखीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.शिवकुमार शिंदे हे सकाळी दूध घेऊन आपल्या दुचाकीवरून मंत्री कॉलनीतून घरी निघाले होते.त्यावेळी वाटेत दबा धरून बसलेल्या ६ ते ७ जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात त्यांचे दोन्ही पाय मोडले आहेत. तसेच एक हातसुद्धा मोडला आहे. पाठीत आणि डोक्यातही मारहाण झाली आहे. एका पायातून अतिरक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयातून हलविण्यात आले आहे. सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील सर्व हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करत आहेत.नामांतराच्या मुद्द्यावरून मतभेद..!प्रतिभा शिंदे या प्रभाग क्रमांक ४ मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्या होत्या. पालिकेच्या सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी अगोदर काही महिने शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या विशेष सभेला प्रतिभा शिंदे या प्रकृतीच्या कारणास्तव उशीरा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याची चर्चा होती. या वेळेपासून शिंदे या शिवसेनेच्या गटापसून अंतर राखून होत्या. त्यात आता शिंदे गटात येण्याचा प्रश्न उद्भवला असल्याची चर्चा होती.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे