सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:36 IST2025-10-07T18:29:07+5:302025-10-07T18:36:37+5:30

शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Sharad Lad son of Sharad Pawar faction MLA Arun Lad joins BJP | सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश

सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश

Sharad Lad joins BJP: सांगलीतशरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सांगलीचे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून त्यांचा पक्ष प्रवेश रखडला होता. त्यानंतर
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच शरद लाड यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा करत आगामी पदवीधर निवडणुकीसाठी मोठी खेळी खेळल्याचे बोललं जात आहे.

शरद पवार गटाचे पुणे विभाग पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांनी मंगळवारी अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचे काम करत आहेत. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामुळे नवभारत घडत आहे. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय. ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. तुम्हा सर्वांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपा कटीबद्ध आहे. बारा बलुतेदारांना न्याय देऊन उन्नती साधण्याचे काम सुरू आहे. ज्या विश्वासाने आज सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरवू," असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

'मोठ्या  संख्येने भाजपामध्ये होत असलेले प्रवेश पाहता विरोधकांना आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार शोधण्याची पाळी येणार आहे,' असे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड आणि इतरांच्या प्रवेशांमुळे भाजपची ताकद परिसरात वाढणार असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यकुशलता, दूरदृष्टी यांने प्रभावित होऊन विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. द्रष्टे नेते पाठीशी असतील तर देश आणि राज्याचा विकास नक्की होणार हा विश्वास सर्वांना आहे. पलुस कडेगावचा युवक भाजपाकडे आशेने बघत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी असलेला पक्ष भाजप, याकडे आम्ही आकृष्ट झालो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पदवीधर निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी झोकून देऊन काम करणार आहे, असं शरद लाड म्हणाले.

सांगलीतून शरद लाड यांच्यासोबत क्रांती साखर कारखाना माजी उपाध्यक्ष पोपट सकपाळ, कारखान्याचे माजी संचालक पोपट फडतरे, माजी जि.प. सदस्य नितीन नवले, ब्रह्मनाळचे उपसरपंच सुभाष वडेर, उपसरपंच संभाजी पाटील, महेंद्र करांडे, भगवंत पाटील आदींचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये श्री विठ्ठल रखुमाई विकास सेवा संस्थेचे चेअरमन दिग्विजय पाटील, विश्वनाथराव पाटील, कला क्रीडा सांस्कृतिक व्यायाम मंडळाचे अध्यक्ष सत्यजित पाटील, माजी नगरसेवक जगन्नाथ पुजारी, एम .बी.मेंडके, संपत कोळी, गजानन साळोखे, रामचंद्र चौगुले, सामाजिक कार्यकर्ता सम्राट मसवेकर आदींचा समावेश आहे. तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये पार्ले गावचे माजी सरपंच आणि शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, शहापूर तालुक्यातील वि.से.सोचे चेअरमन दत्तात्रय शेलार, कोपर्डी हवेलीचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जालिंदर चव्हाण, कामगार नेते नवनाथ पाटील, ज्येष्ठ नेते भास्कर पाटील यांचा समावेश आहे.

Web Title : शरद पवार की राकांपा को झटका: सांगली में विधायक पुत्र भाजपा में शामिल।

Web Summary : सांगली में, शरद पवार की राकांपा को झटका लगा क्योंकि विधायक अरुण लाड के बेटे, शरद लाड, भाजपा में शामिल हो गए। चंद्रकांत पाटिल ने प्रवेश की घोषणा की, आगामी स्नातक चुनावों के लिए भाजपा को बढ़ावा मिला। सांगली, कोल्हापुर, सतारा के कई कार्यकर्ता भाजपा में शामिल हुए।

Web Title : Sharad Pawar's NCP faces setback: MLA's son joins BJP in Sangli.

Web Summary : In Sangli, Sharad Pawar's NCP faced a setback as MLA Arun Lad's son, Sharad Lad, joined BJP. Chandrakant Patil announced the entry, boosting BJP for upcoming graduate elections. Many workers from Sangli, Kolhapur, Satara joined BJP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.