शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना दहा हजार रुपये सन्मान धन मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST

इस्लामपूर : ज्येष्ठ नागरिकांना सन्मान धन म्हणून दहा हजार रुपये महागाई भत्त्याला जोडून मिळावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह कॅबिनेट ...

इस्लामपूर : ज्येष्ठ नागरिकांना सन्मान धन म्हणून दहा हजार रुपये महागाई भत्त्याला जोडून मिळावेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालयासह कॅबिनेट मंत्री व स्वतंत्र बजेट मिळावे, ज्येष्ठांसाठी अ‍ॅट्रॉसिटीसारखा कायदा बनविण्यात यावा, अशा मागण्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी केल्या.

येथील पंचायत समितीच्या बचत धाममध्ये अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव अभियान मेळावा झाला. यावेळी सांगलीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे -पाटील, कोल्हापूरचे पी. के. पाटील, डॉ. विजयकुमार स्वामी, सचिव गजानन पाटील, सल्लागार गोविंदराज परांजपे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

मोरे म्हणाले, ज्येष्ठांसाठी वाहतूक संरक्षण कायदा, नागरी सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून शासनाने घोषित करावे.

पी. के. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या कुटुंबात येत चाललेला दुरावा दूर करण्यासाठी ज्येष्ठांना सन्मानधन मिळालेच पाहिजे. डॉ. स्वामी यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. अ‍ॅड. किरण पाटील यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक सल्ला व सुविधा मोफत देणार असल्याचे सांगितले. डी. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

चंद्रशेखर मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनुप वाडेकर यांनी आभार मानले. यावेळी विजयराव लोंढे, हणमंतराव पाटील, आर. एन. मोहिते, नारायण सावंत, भगवान पाटील, रघुराज मेटकरी, हिंदुराव पवार, प्रवीण माने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते.

फोटो - ०३०२२०२१-आयएसएलएम-ज्येष्ठ नागरिक न्यूज

इस्लामपूर येथे ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात जगन्नाथ मोरे-पाटील यांच्याहस्ते पी. के. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयराव लोंढे, अनुप वाडेकर, अ‍ॅड. किरण पाटील, आर. एन. मोहिते उपस्थित होते.