संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत सूचना पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:24+5:302021-02-20T05:18:24+5:30

शिराळा : भुईकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत शिराळकरांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात नगरपंचायतीकडे पाठवाव्यात, ...

Send instructions regarding Sambhaji Maharaj's memorial | संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत सूचना पाठवा

संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत सूचना पाठवा

शिराळा : भुईकोट किल्ल्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत शिराळकरांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात नगरपंचायतीकडे पाठवाव्यात, असे आवाहन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

शिराळा येथील भुईकोट किल्ल्याचा राज्यशासन पर्यटनदृष्ट्या विकास करणार आहे. त्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीतील निर्देशानुसार आमदार मानसिंगराव नाईक व आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी भुईकोट किल्ल्याची पाहणी केली. त्यावेळी बोलत होते.

किल्ल्याचे एकूण क्षेत्र, उपलब्ध जागा, तटबंदी, कोटेश्वर मंदिर, विहीर, त्यातील भुयारी मार्ग, पूर्वीच्या इमारतींचे भग्नावशेष व त्यांचे महत्त्व यांची पाहणी केली. यावेळी तटबंदी दुरुस्ती, छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा, महाराजांना संगमेश्वरला अटक झाली, तेथून त्यांचा झालेला प्रवास, शिराळा येथे त्यांना सोडविण्यासाठी मराठ्यांनी केलेला प्रयत्न याचे रेखाचित्र असलेले स्मारक, जवळच असलेल्या शिवकालीन भवानीमाता मंदिराचा विकास व एकूणच पर्यटनदृष्ट्या आणखी जे काही करणे शक्य आहे, त्या गोष्टींचा समावेश या विकासात असेल. ज्या इमारती उभारल्या जातील, त्या पुरातन धर्तीवर दगडाच्या असतील. जेणेकरून पर्यटकांना इतिहास काळातील अनुभूती येईल, असा प्रयत्न राहील, असे आमदार नाईक यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, युवा नेते विराज नाईक, नगरसेवक विश्वाप्रताप नाईक, मोहन जिरंगे, राजू निकम, बसवेश्वर शेटे, प्रमोद पवार, बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल केकरे, अभियंता दिनकर महिंद, राजू खुर्द, सनी आवटे, बाबा गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Send instructions regarding Sambhaji Maharaj's memorial