शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

संशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:53 PM

पक्षांतर्गत माझ्याविषयी काहीजण जाणीवपूर्वक संशयास्पद वातावरण निर्माण करीत आहेत. सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ््या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देसंशयास्पद वातावरण तयार करणाऱ्यांचा शोध घेऊ : संजयकाका पाटीलतिकिटासाठी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

सांगली : पक्षांतर्गत माझ्याविषयी काहीजण जाणीवपूर्वक संशयास्पद वातावरण निर्माण करीत आहेत. सोशल मिडियावर पोस्ट टाकण्यापासून स्थानिक पातळीवर वेगळ््या चर्चा करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. त्यांचा आम्ही शोध घेऊ, असे खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ते म्हणाले की, पक्षांतर्गत गटबाजीचे राजकारण नाही, मात्र काहीजण संशयास्पद वातावरण तयार करताहेत, ही गोष्ट खरी आहे. आम्ही त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊ. सुरेश खाडे यांनी कोणतेही गैर वक्तव्य केलेले नाही. कोणाचीच उमेदवारी निश्चित नसल्याने त्याबद्दल ठामपणे सांगणे योग्य नाही. खाडे यांनी केलेले वक्तव्य आकसबुद्धितून नाही.

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी बऱ्याचदा जाहीर सभांमध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्यांना तो अधिकार आहे, पण स्थानिक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अशाप्रकारच्या गोष्टी जाहीर करता येत नाहीत. पक्षाकडे मी रितसर उमेदवारीची मागणी केली आहे. माझे पाच वर्षातील काम चांगले असल्याने मी त्याबद्दलचा दावा केला आहे.

माझ्यासह अनेकजण खासदारकीच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. लोकशाही मार्गाने त्यांनी उमेदवारी मागणे यात गैर काही नाही. सर्वच पक्षातील लोकांशी माझे चांगले संबंध असल्याने त्याचा फायदा पक्षाला मतांच्या माध्यमातून होऊ शकतो.तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात माझे अधिक लक्ष असल्याबद्दल चर्चा होत असली तरी मतदारसंघात सर्वत्रच माझा संपर्क आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या जनतेने माझ्या राजकीय जडणघडणीत मोठी साथ दिली आहे. त्यामुळे या भागाविषयी प्रेम असणे स्वाभाविक आहे. राजकीय पेरणी म्हणून याठिकाणी मी कधीही लक्ष घातलेले नाही. त्यामुळे त्याअर्थाने कोणी येथील कामांकडे पाहू नये.घोरपडेंशी माझी चर्चाअजितराव घोरपडे हे भाजपचेच आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षाबद्दलच्या नाराजीची चर्चाही चुकीची आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हा दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. त्यांमुळे ते वेगळी राजकीय भूमिका घेऊन जात असल्याबद्दलची चर्चा चुकीची आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.गर्भगळीत होणारा कार्यकर्ता नाही!पक्षांतर्गत कोण काय म्हणत असतो, कोणत्या चर्चा पसरविल्या जात असतात, याकडे मी फारसे लक्ष देत नाही. अशा गोष्टींमुळे गर्भगळीत होणारा मी कार्यकर्ता नाही. विकासकामांच्या माध्यमातून माझे नाणे खणखणीत केले आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sangliसांगली