सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST2019-06-15T16:30:47+5:302019-06-15T16:32:32+5:30
तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे निधन
तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले.
लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने सावळज गटावर शोककळा पसरली आहे. सावळजमधील बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सायंकाळी त्यांच्यावर सावळज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. लोणावळ्याजवळ नाष्टा करून गाडीत बसताना पाटील यांची साखरपातळी अचानक वाढली. त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना लोणावळा येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.