शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

चहापावडर विकून सावरला संसार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : घरची परिस्थिती तशी बेताचीच...पतीचा चहापावडर विक्रीचा व्यवसाय...संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या...सारं काही आनंदात सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : घरची परिस्थिती तशी बेताचीच...पतीचा चहापावडर विक्रीचा व्यवसाय...संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या...सारं काही आनंदात सुरू होते. पण २६ जानेवारी २००६ या दिवशी नयन नितीन पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पतीने आकस्मिक निधन झाले. पदरात तीन मुली, आर्थिक स्थिती म्हणावी तितकी चांगली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी पतीचा व्यवसाय स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. संकटांशी दोन हात करत त्यांनी मुलींना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला. चिकाटी, जिद्द आणि अपार कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांनी चहापावडर विकून स्वत:चा संसार तर सावरलाच, शिवाय मुलींनाही उच्च शिक्षणाची दारे खुली करून दिली.

शहरातील रमामातानगरमधील माने प्लाॅटमध्ये नयन पवार या तीन मुली व आईसोबत राहतात. घराचे नावही ‘समाधान’; पण कष्टाशिवाय समाधान मिळत नाही, असे म्हटले जाते, त्याची प्रचिती पवार यांच्या कहाणीतून समोर येते. वयाच्या १९ व्यावर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती नितीन पवार हे चहापावडर विकून घराचा गाडा चालवित होते. त्या स्वत: चहाच्या दुकानात काम करीत होत्या. संसाराच्या वेलीवर तीन कळ्या उमललेल्या. कष्टाचे दिवस असूनही सुखाला तोटा नव्हता. पण २६ जानेवारी २००६ रोजी नितीन यांचे अचानक निधन झाले आणि हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून कसेबसे सावरत नयन पवार यांनी कुटुंबाची सूत्रे हाती घेतली.

नयन पवार यांना पुढे शिकण्याची इच्छा होती. पण १२ वीनंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले. आपल्या तीनही मुलींना उच्चशिक्षित बनविण्याची खूणगाठ बांधून त्या कामाला लागल्या. पतीचा चहापावडर विकण्याचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. आधीच्या उधारीच्या वसुलीसाठी त्या दारोदार जात होत्या. काहींनी घरात आणून चहापावडरची उधारी दिली; तर काहींनी टोलवाटोलवी केली. त्या परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी घराघरात जाऊन चहापावडरची विक्री सुरू केली. सुरुवातीला पायीच त्या फिरत होत्या. थोड्या दिवसात त्यांनी सायकल शिकून घेतली. पतीच्या निधनानंतर नातेवाईकांनी, मुलींना फार न शिकविता लग्नं करू द्या, असा सल्ला दिला होता. पण त्यांनी मात्र मुलींना शिकवून मोठे करण्याचा निर्धार केला होता. मुली जसजशा पुढच्या इयत्तेत जात होत्या, तसे आर्थिक गणित जुळवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यातून त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. तीनही मुली शाळेत हुशार होत्या. दहावी, बारावीत चांगले गुण होते. त्यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळविले होते. मोठी मुलगी गायत्रीने काॅम्प्युटर सायन्स करुन पुढे एमएसडब्ल्यू केले, तर दुसरी मुलगी रक्षंदा इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर झाली आहे. धाकटी नंदिता तर दहावीला जिल्ह्यात पहिली आली होती. तिचे सीए बनण्याचे स्वप्न आहे. अजूनही नयन पवार या चहापावडर विक्रीचा व्यवसाय करतात. आता मुलींकडून त्यांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी मदत होत आहे.