सरपंच स्वच्छता संवाद उपक्रमाचे आज आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:03+5:302021-09-25T04:28:03+5:30

सांगली : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दि. ...

Sarpanch Sanitation Dialogue Initiative organized today | सरपंच स्वच्छता संवाद उपक्रमाचे आज आयोजन

सरपंच स्वच्छता संवाद उपक्रमाचे आज आयोजन

सांगली : देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जिल्हास्तरीय ‘सरपंच स्वच्छता संवाद’ या ऑनलाइन संवाद उपक्रमाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री जयंत पाटील मार्गदर्शन करणार असून जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

प्राजक्ता कोरे व जितेंद्र डुडी पुढे म्हणाले, जिल्ह्यात दि. २५ ऑगस्टपासून १०० दिवसाचे “ स्थायित्व व सुजलाम अभियान” राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्थानिक पातळीवर लोकसहभागाच्या माध्यमातून सामुदायिक स्तरावर सांडपाणी व्यवस्थापन करण्याकरिता सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरीय ‘सरपंच स्वच्छता संवाद’ या ऑनलाइन संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Sarpanch Sanitation Dialogue Initiative organized today