शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वतीचा दास इलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST

कवितेचे हे नवीन दालन, नवीन एक प्रवास सरस्वतीचा दास इलाही सरस्वतीचा दास कधी दोहे, कधी गझल, कधी कविता, तर ...

कवितेचे हे नवीन दालन, नवीन एक प्रवास

सरस्वतीचा दास इलाही सरस्वतीचा दास

कधी दोहे, कधी गझल, कधी कविता, तर कधी मुक्तकांमधून भावनांची वादळे प्रकट करीत रसिकांच्या मनातील भाव-भावनांच्या वादळाशी समरस होण्याचा, त्यांच्या हृदयात वास करण्याचा प्रयत्न गझलकार इलाही जमादार यांनी आयुष्यभर केला. पुस्तकांवर, त्यांच्या गझलांच्या सादरीकरणावर रसिकांकडून प्रकटणारे वेड्यासारखे प्रेम कधीच मावळले नाही. किंबहुना हे वेड भावल्यानेच इलाहींच्या हातून गझलांचा व काव्यप्रकारांचा आविष्कार होत राहिला. काव्यझऱ्यातून प्रकटल्यानंतर सलग ५६ वर्षे अखंडितपणे हा निखळ इलाही प्रवाह वाहता राहिला. त्यांच्या प्रत्येक काव्यजलातून रसिकांची तृषा शांत व्हायची. चार तपांहून अधिक काळ सरस्वतीचा दास बनून २० हून अधिक पुस्तकांमधून त्यांनी गझलविश्वाला समृद्ध केले. इलाही जमादारांनी वेदनांच्या वादळांना कवेत घेत, शब्दांमधून रसिकांशी संवाद साधत मन मोकळे करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मकतेला सकारात्मक निर्मितीच्या वाटेवरून नेताना त्यांनी एक नवा आदर्श पाठ दिला.

सारी भणंग स्वप्ने, माझ्याच मालकीची

जाळीत आसवांना, प्रत्येक रात गेली

इलाही जमादारांनी आयुष्याच्या वाटेवर अनेक दु:खे भोगली; पण त्या प्रांतात त्यांनी कोणालाही प्रवेश दिला नाही. गझलांमधून त्यांनी अप्रत्यक्ष संवाद साधला. त्यामुळेच मीरा त्यांना त्यांची समदु:खी वाटली. मीरेचा विराणा अनुभवत त्यांनी ‘मला उमगलेली मीरा’ हे पुस्तक लिहिले. मीरेसह महाभारत हा खंडही त्यांना भावला. महाभारतातील अनेक पात्रे त्यांच्या गझलांमधून सतत डोकावत राहिली. महाभारतावर काव्यखंड करण्याचा त्यांचा मानसही मौन बाळगून राहिला.

इलाही जमादार यांनी अनेक नवे गझलप्रकार उर्दू व अन्य भाषांमधून मराठीत आणले. हजल, द्विभाषिक गझल, त्रिवार काफिया गझल, मुस्तजाद गझल, सेमिसरी गझल, जुलकाफिया गझल, मुक्ताबंद गझल, तखल्लूस रदीफ असलेली म्हणजेच कवीचे नाव असलेली गझल, सवतीकाफिया गझल अशा विविध प्रकारांना त्यांनी आपल्या लेखणीतून मराठीत उतरविले. मराठी गझलेतील मक्ता लिहिण्याची मक्तेदारीही त्यांनी मिळवली. दोन-दोन ओळींच्या काव्यपंक्तींतून इतका मोठा भावार्थ प्रकट करणारा हा कवी कुठे आहे, अशी विचारणा प्रख्यात गायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम्‌ यांनी केली होती. इलाहींच्या गझलांना एस.पीं.च्या आवाजाची जादू ‘निशिगंध’ या अल्बममधून लाभली. मात्र इलाहींच्या जादूई लिखाणाचा असर एसपींवर झाला. इलाहींनाही त्यांना भेटण्याची इच्छा होती. मात्र ही भेट कधीच झाली नाही. हे दोन्ही तारे निखळले.

ज्या मराठीने एवढे प्रेम दिले, तिची आयुष्यभर सेवा करण्याचा संकल्प इलाहींनी काही पुस्तकांमधून मांडला व तो पूर्णत्वास नेला. रसिकांच्या हृदयअवकाशात त्यांनी शिंपडलेले शब्दांचे चांदणे त्यामुळेच दीर्घकाळ चमकत राहील. मराठी रसिकांना आनंदसागरात सतत न्हाऊ घालणाऱ्या इलाहींच्या आयुष्यातील वादळे अखेरपर्यंत घाेंघावत राहिली. म्हणूनच पहिल्या पुस्तकातील त्यांच्या छायाचित्राखालील शेेर त्यांच्या वेदना प्रकट करून जातो.

‘मेरी उदास रुह को, जिसकी तलाश थी

वो चीज ही अजीब थी, वो मेरी लाश थी’