शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचा समीर कठमाळे अपराजित

By admin | Updated: June 11, 2016 00:30 IST

नऊ सामन्यांत सलग विजय : वरदराज मेमोरियल बुद्धीबळ स्पर्धेत यश

सातारा : येथील छ. जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलदगती बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद सांगलीच्या इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे याने ९ सामन्यात ९ गुण मिळवत शेवटपर्यंत अपराजित राहत जिंकले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत एकूण सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, सोलापूर, चेन्नई, बेळगाव, नाशिक, परभणी, नागपूर येथून एकूण २०० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये वयोवर्षे ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या खेळाडूंनी तसेच अग्रमानांकित खेळाडू इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे (सांगली) व पुण्याचे फिडे मास्टर आर. एस. गुप्ता यांच्यासह ९० आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, ज्येष्ठ बुद्धीबळ खेळाडू अशोक लढ्ढा, सातारा जिल्हा बुद्धीबळ असो. चे अध्यक्ष जयंत उथळे, प्रशांत शिंगटे, विशाल कणसे व कुटुंबीय आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रणव टंगसाळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातारा चेस फॅन क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. पौर्णिमा उपळाविकर यांनी सूत्रसंचालन केले. पूनम जाधव यांनी आभार मानले. स्पर्धेतील गटनिहाय विजेते खालीलप्रमाणे : खुला गट : समील कठमाळे, शंतनू भांबुरे, राहुल सामानगडकर, उत्कर्ष लोमटे, आर. एस. गुप्ता, उमेश कुलकर्णी, रोहन जोशी, केतन खैरे, ओंकार कडव, इम्रान शिकलगार, हेमंतकुमार मांढरे, गोपाळ राठोड, महेशकुमार भिंताडे, सागर मोहिते, कुणाल मापुसकर. ७ वर्षांखालील : तनय फडणीस, आरुष खोराटे, अवनीश हान्डूर, चैत्राली जाधव, सौम्या कुलकर्णी. ९ वर्षांखालील : निशित बलदवा, दीपांषु पाटील, सर्वेश काटकर, आदित्य भोसले, यश भागवत. ११ वर्षांखालील : ज्योतिरादित्य जाधव, समृद्धी कुलकर्णी, सारंग पाटील, मयुरेश मगदूम, प्रणव गुनके. १३ वर्षांखालील : ईशा कोळी, चेतन पोटे, ओम चोरडिया, ओम सुर्वे, अभिजित भोसले. १५ वर्षांखालील : मिहीर जोशी, योगेश भट, मृणालिनी घाडगे, अथर्व चव्हाण, चेतन मुटगेकर. १९ वर्षांखालील : प्रिन्स जैसवाल, ऋषिकेश भिलारे, अनिष भोसले. (प्रतिनिधी)