शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सांगलीचा झेंडा

By admin | Updated: March 14, 2015 00:00 IST

निकाल जाहीर : राजश्री शिंदे २७ वी

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यंदाही जिल्ह्यातील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला निकाल आज, शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील जयदीप पाटील हा राज्यात १८ वा, तर मीनाक्षी माळी ही ओबीसीमध्ये राज्यात २० वी आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता असलेल्या राज्यातील ७१४ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. २५ आॅगस्ट २०१३ रोजी पूर्वपरीक्षा, तर ८ डिसेंबर २०१३ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. शारीरिक चाचणी परीक्षा २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०१४ या कालावधित घेण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यशाचा आलेख कायम ठेवला आहे. आष्टा येथील नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी केंद्रातील रघुनाथ शिंदे, अवधूत शिंदे, विशाल पाटील, रितेश माळी, सागर पवार, जयदीप पाटील, बसवराज माळी, गणेश कोल्हाळ, शुभांगी जगताप, प्रगती पाटील यांनी यश मिळविले.इस्लामपूर येथील महाराष्ट्र अ‍ॅकॅडमीतील पोपट काशीद, मीनाक्षी माळी, दीपाली थोरबोले, विजय सुतार, प्रदीप जाधव, सूर्यकांत सपताळे (एससी मध्ये राज्यात २१ वा) यांनी, तर राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातील रोहित फारणे, किरण मगदूम, स्वप्नील पाटील, अमिन पाटील, अर्चना चिवटे, सुषमा उगळे, पूनम जगताप यांनी यश संपादन
केले.
त्याचप्रमाणे तासगाव तालुक्यातील अंजनी येथील राजश्री शिंत्रे (राज्यात २७ वी), विट्यातील अमोल खटावकर, सुषमा शितोळे यांनीही यश मिळविले. (प्रतिनिधी)