शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli ZP Election Results 2026: जयंत पाटलांचा वरचष्मा, वाळव्यात महायुतीला धक्का देत राष्ट्रवादीची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:14 IST

महाडीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ गटात आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोरगाव गटात जयंत पाटील यांनी दोन्हीकडे हादरे दिले

ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांनी महायुतीला अंगावर घेत पुन्हा एकदा आपला वरचष्मा सिद्ध केला. जिल्हा परिषदेच्या ७ जागांवर आणि त्यातील १४ गणांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.तर चिकूर्डे गटातून उद्धवसेनेच्या अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीच्या साथीने आपला गड राखला आहे. तर येलूर, कामेरीतून भाजपने आघाडी घेतली असून वाळव्यात शिंदेंसेना आणि बागणी गटात रयत क्रांतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.येथील शासकीय धान्य गोदामात वाळवा तालुक्यात मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार आहेत.एकूण २२ टेबलवर मोजणी सुरू आहे.गेल्यावेळी आमदार जयंत पाटील गटाची सदस्य संख्या वाढणार आहे. महाडीकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेठ गटात आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बोरगाव गटात जयंत पाटील यांनी दोन्हीकडे हादरे दिले आहेत. तसेच पंचायत समितीवरील आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे.वाळवा आणि बावची या दोन गटात शिंदेंसेनेच्या गौरव नायकवडी यांनी आपला करिष्मा दाखवला आहे. दोन्ही ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर बागणी गटात आमदार सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी सागर खोत या आघाडीवर आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli ZP Election: Jayant Patil Dominates, NCP Gains in Walva

Web Summary : Jayant Patil's NCP dominated Sangli ZP elections, challenging Mahayuti in Walva. NCP leads in most ZP seats and Panchayat Samiti. Shinde's Sena and Rayat Kranti candidates lead in some areas. NCP regained power in Panchayat Samiti.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीResult Dayपरिणाम दिवसJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती