शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच : चंद्रकांत पाटील; व्हिपबाबत केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:33 IST

जगताप यांच्या आरोपात तथ्य नाही

सांगली : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार आहे, तो कसा होईल हे योग्य वेळी सांगण्यात येईल, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच व्हिप बजावण्याचा अधिकारी संबंधित पक्षाच्या गट प्रमुखांचा असून महायुतीला मतदान केले नाही तर संबंधित पक्षाचा गटनेता 'त्या' सदस्याचे सदस्यत्व रद्द करेल, असं मी मागील आठवड्यात म्हटलं होतं. त्याचा अनेक राज्यकर्त्यांनी वेगळाच अर्थ काढला, असेही त्यांनी स्पष्टीकरण दिले.सांगलीत महिला दिनानिमित्त रविवारी जिल्हा प्रशासनाच्या कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 'यलो बेल्ट ग्रेड' प्रमाणपत्र वितरण झाले. यावेळी पत्रकारांशी चंद्रकांत पाटील बोलत होते.

वाचा: भाजपला नाकारलं, तरीही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न; पराभवाची सवय करून घ्यावी, विशाल पाटील यांनी लगावला टोलाचंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेत भाजपकडे कमी जागा असल्या तरी महायुतीला बहुमत आहे. त्यादृष्टीने राज्यस्तरावरील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष असणार आहे. सत्ता स्थापन्याबाबतचे गणित काय हे योग्य वेळी तुम्हाला सांगितले जाणार आहे.

जगताप यांच्या आरोपात तथ्य नाहीजिल्हा प्रशासनाला प्रशासकीय कामकाजात कुठेही दबाव टाकण्याची पद्धत भाजपची नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा गटनेता नोंदणी, व्हिप बजावण्याच्या प्रकरणात आम्हाला पडायची गरज नाही. गटनेता नोंदणीमध्ये अडथळा निर्माण करण्याने काय साध्य होणार आहे हे माजी आमदार विलासराव जगताप यांनाच माहीत असावे. आम्ही तर कुणावरच कसलाच दबाव टाकला नाही. जगताप यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही, असा खुलासा पालकमंत्री पाटील यांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Zilla Parishad President Will Be From Mahayuti: Chandrakant Patil

Web Summary : Chandrakant Patil affirmed Mahayuti will secure the Sangli Zilla Parishad president post. He clarified his earlier statement on whip, stating party leaders can disqualify members defying Mahayuti. He refuted allegations of pressuring administration regarding the appointment of the NCP group leader, dismissing claims by Vilasrao Jagtap.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Sangliसांगलीzpजिल्हा परिषदchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाMahayutiमहायुती