शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ सांगली आवृत्तीचा आज वर्धापनदिन सोहळा...

By admin | Updated: February 15, 2015 23:51 IST

स्नेहमेळावा : विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान

सांगली : वाचकांच्या पाठबळावर प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासार्हतेची परंपरा जपत सांगली जिल्ह्यात ‘लोकमत’ची दमदार वाटचाल सुरू आहे. स्नेहाचा हा झरा अखंड वाहता रहावा, यासाठी ‘लोकमत’ सांगली आवृत्तीच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त आज सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांचे ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.‘लोकमत’च्या दमदार वाटचालीत वाचक, हितचिंतक, वृत्तपत्र विक्रेते, एजंट, जाहिरातदार व समाजातील प्रत्येकाने प्रेमाचा वर्षाव केला आहे. या जिव्हाळ्याचे बंध आणखी दृढ व्हावेत, या उद्देशाने सोमवारी (दि. १६) स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल (आरटीओ कार्यालयाशेजारी) येथे सायंकाळी हा स्नेहमेळावा होणार आहे. यंदाच्या सोळाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत विश्वंभर चौधरी यांचे ‘महासत्ता भारत की आनंदी भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. स्नेहमेळाव्याच्या ठिकाणीच सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होईल. निरपेक्ष वृत्तीने जपलेल्या नीतीमूल्यांचा आदर केल्यामुळेच वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यात आणि यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यात ‘लोकमत’ परिवार यशस्वी ठरला आहे. कृष्णा-वारणाकाठच्या संपन्न परंपरेप्रमाणे प्रेमाने समृद्ध झालेला हा परिवार नवचैतन्य, उत्साहानिशी नव्या वाटचालीस सज्ज झाला आहे. या वाटचालीत सर्वांच्या प्रोत्साहनाची आवश्यकता वाटते, म्हणूनच वर्धापनदिनाच्या सोहळ््यास प्रत्येक क्षेत्रातील घटकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने केले आहे. (प्रतिनिधी)


विशेषांकाचे प्रकाशन होणार
वर्धापनदिनानिमित्त ‘मेक इन सांगली’ हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असून, त्यातून जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, उद्योग, आरोग्य, कृषी, शैक्षणिक, शहर सुधार आदी क्षेत्रातील वाटचाल, भविष्यातील चित्र यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्ह्याचे बदलते रूप आणि अपेक्षांचा ऊहापोह याद्वारे करण्यात आला आहे. दि. १४, १५, १६ व १७ फेब्रुवारी असे चार दिवस हा विशेषांक वाचकांना दिला जात आहे.