शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
3
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
4
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
5
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
6
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
7
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
8
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
9
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
10
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
11
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
12
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
13
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
14
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
15
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
17
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
18
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
19
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
20
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
Daily Top 2Weekly Top 5

शिव स्मारकासाठी सांगलीतून माती, जलकलश रवाना

By admin | Updated: December 22, 2016 23:35 IST

मुंबईत मिरवणूक : भूमिपूजन सोहळ्यासाठी शिवप्रेमींना निमंत्रण

सांगली : मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिव स्मारकासाठी सांगलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि नद्यांचे जल कलशांमध्ये भरून रवाना झाले. येथील शिवाजी पुतळ्याजवळ या कलशांचे पूजन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सांगलीत गुरुवारी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातून आलेले माती व जलकलश एकत्र करण्यात आले. जवळपास १२ कलशांमध्ये जल आणि १२ कलशांमध्ये माती घेऊन प्रत्येक तालुक्यातून भाजपचे पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक आले होते. जिल्ह्यातील सर्व नद्यांचे जल नंतर एका कलशात, तर सर्व माती दुसऱ्या कलशात एकत्रित करण्यात आली. हे दोन्ही कलश शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठेवून त्यांचे पूजन करण्यात आले. मकरंद देशपांडे या संकल्पनेविषयी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये शिवरायांनी पदस्पर्शाने इतिहास घडविला आहे. अशा सर्व ऐतिहासिक स्थळांवरील माती आणि नद्यांचे पाणी मुंबईतील शिव स्मारकाच्या भूमिपूजनासाठी वापरण्यात येणार आहे. हा सोहळा प्रत्येक शिवप्रेमींनी अनुभवायला हवा. भाजप, शिवप्रतिष्ठान, शिवसेना व अन्य संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कलश पूजनासाठी उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणा देत हे दोन्ही कलश सदाभाऊ खोत व संजयकाका पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. फुलांनी सजविलेल्या एका जीपमध्ये कलश ठेवण्यात आले. भगवे ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हे कलश मुंबईला रवाना झाले. मुंबईतील चेंबूर येथे शुक्रवारी, २३ डिसेंबरला सकाळी हे कलश दाखल होतील. तेथून विविध ठिकाणांहून आलेल्या कलशांची एकत्रित मिरवणूक गेट वे आॅफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व कलश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले जातील. २४ डिसेंबर रोजी मुख्य सोहळ्यात हे कलश पुन्हा एकत्रित केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातून सर्वपक्षीय, शिवप्रेमी नेते, कार्यकर्ते या सोहळ्यासाठी जाणार आहेत.(प्रतिनिधी)येथून आले माती, जलकलश...आटपाडीतून माणगंगा, कडेगावमधील येरळा, पलूस, मिरज, वाळवा येथील कृष्णा आणि वारणा, शिराळ्यातून तोरणा, मोरणा, भोगावती, तीळगंगा, जतमधील बोर अशा नद्यांचे जल कलशांमधून आणले होते. आटपाडी तालुक्यातील बाणूरगड, मिरजेतील भुईकोट किल्ला, वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड, शिराळा तालुक्यातील प्रचितगड, भुईकोट किल्ला, बहाद्दूरवाडी येथील अंबाबाई मंदिर, जत तालुक्यातील प्रतापराव गुजर समाधीस्थळ येथील माती कलशांमधून भरुन आणण्यात आली होती.