सांगली : कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्ये, मुंबईत कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 16:40 IST2018-09-06T15:51:25+5:302018-09-06T16:40:17+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सांगली : कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने भाजपमध्ये, मुंबईत कार्यक्रम
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसलासांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठेमहांकाळच्या नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कवठेमहांकाळ नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या होत्या. यावेळी कवठेमहांकाळ तालुक्यातील भाजप नेते उपस्थित होते.
कवठेमहांकाळ नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील, सगरे आणि भाजप नेते अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी आघाडीची सत्ता आहे. यामध्ये स्वाभिमानी आघाडीचे १३ नगरसेवक आहेत, तर भाजपच्या संजय पाटील गटाचे ४ नगरसेवक आहेत.
माने यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर. आर. पाटील गटाला धक्का बसला आहे. शहराच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नगराध्यक्ष सविता माने यांनी सांगितले आहे.