चांदोली धरणावर सांगली पोलिसांचे मॉक ड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:04 IST2025-05-10T16:01:15+5:302025-05-10T16:04:11+5:30

वारणावती : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ रोजी युद्धजन्य परिस्थितीचे ‘मॉक ड्रिल’ ...

Sangli Police conducts mock drill at Chandoli Dam against the backdrop of war situation | चांदोली धरणावर सांगली पोलिसांचे मॉक ड्रिल

चांदोली धरणावर सांगली पोलिसांचे मॉक ड्रिल

वारणावती : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सांगलीपोलिसांच्या वतीने शुक्रवार, दि. ९ रोजी युद्धजन्य परिस्थितीचे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आले. यावेळी युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळायची याची रंगीत तालीम व आपत्कालीन यंत्रणांची तयारी तपासण्यात आली.

या रंगीत तालमीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ११ ते दुपारी २ या वेळेत चांदोली धरण ब वर्ग मर्मस्थळ येथे असणाऱ्या जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल व मॉक ड्रिल घेण्यात आले. वारणा धरण क्षेत्रात धरणावर तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शिराळा तालुक्यातील महसूल, पोलिस प्रशासन, पाटबंधारे, अग्निशमन दल, आदी प्रमुख विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक ड्रिल झाला. यावेळी अग्निशमन दलासह आरोग्य विभागाचे वाहनही सज्ज ठेवण्यात आले होते.

या मॉक ड्रिलसाठी १४ पोलिस अधिकारी व ६५ पोलिस अंमलदार तसेच सीआयडीचे २ अधिकारी, आयबीचे २ अधिकारी, एटीएसचे एक अधिकारी व २ अंमलदार, सुरक्षा शाखेचे १ अधिकारी व ०२ अंमलदार, क्यूआरटीचे ०१ अधिकारी १० अंमलदार, बीडीडीएसचे ०१ अधिकारी ०६ अंमलदार यांच्यासह शिराळा तहसीलदार, तीन महसूल कर्मचारी, ३ ॲम्ब्युलन्स, २ डॉक्टर १२ मेडिकल स्टाफ, शिराळा नगरपंचायतीचे २ कर्मचारी, इस्लामपूर नगरपालिका येथील फायर ब्रिगेडसह ४ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे २ कर्मचारी, आदी मनुष्यबळ वापरण्यात आले. 

तसेच १ फायर ब्रिगेड, ३ ॲम्ब्युलन्स, चारचाकी ६ सरकारी वाहने दोन दुचाकी वापरण्यात आल्या. यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, शिराळा पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, कुरळप पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील, कोकरूड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sangli Police conducts mock drill at Chandoli Dam against the backdrop of war situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.