शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

सांगली : रुग्णालयांना महापालिकेचा परवाना आता बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 9:21 PM

चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. खासगी रुग्णालयांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वच रुग्णालयांना महापालिकेचा परवाना बंधनकारक

ठळक मुद्देआरोग्य विभागाची आढावा बैठक : पुढील महासभेत निर्णय घेण्यात येणारआरोग्य विभागाच्या पथकाने महापालिका क्षेत्रातील २६४ रुग्णालयांची तपासणी

सांगली : चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. खासगी रुग्णालयांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वच रुग्णालयांना महापालिकेचा परवाना बंधनकारक करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मांडण्याचा महत्त्वाचा निर्णय शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत अनेक डॉक्टर्स मुदतबा' औषधे रुग्णांना देत असल्याची गंभीर बाब तपासणीत समोर आल्याचेही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

गणेशनगरमधील पाचव्या गल्लीतील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदेशीर गर्भपाताचा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेकडून दहा आरोग्य पथकांची नेमणूक केली असून, तिन्ही शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांची तपासणी सुरू केली आहे. यात रुग्णालयांकडे परवाना नाही, शैक्षणिक पात्रता असणारे डॉक्टर्स नाहीत, मुदतबा' औषधे सर्रास देणे, यासह अन्य गंभीर प्रकार चौकशीत समोर आले आहेत.

शनिवारी महापौर संगीता खोत, आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त स्मृती पाटील, सभागृह नेते युवराज बावडेकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या दहा पथकातील वैद्यकीय अधिकाºयांनी किती रुग्णालयांची पाहणी केली, तपासणीत आढळून आलेल्या आक्षेपार्ह बाबींची माहिती दिली. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रुग्णालयांमध्ये कायद्याची अंमलबजावणी होत नाही तसेच बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार काम होत नाही. तिन्ही शहरातील अनेक रुग्णालयाांध्ये जैविक कचºयाचे विघटन करणारी यंत्रणा नसून महापालिकेने जैविक कचरा उचलण्यासाठी एजन्सीची नेमणूक करूनही त्यांच्याकडे रुग्णालयांमधून जैविक कचरा दिला जात नाही. रजिस्टरवर महिन्याच्या एकदम स'ा घेऊन कागदोपत्री जैविक कचरा उचलण्यात येत असल्याच्या नोंदी ठेवण्यात येत असल्याचेही गंभीर प्रकार अधिकाºयांनी सांगितले.आरोग्य विभागाच्या पथकाने महापालिका क्षेत्रातील २६४ रुग्णालयांची तपासणी केली असून, अद्यापही १५९५ रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार आहे. पथकाकडून रुग्णालयांची तपासणी सुरू असताना काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. शहरातील बड्या रुग्णालयांसह सर्व जनरल पॅ्रक्टीशनर्सनाही महापालिकेच्या कायदा चौकटीत आणून कार्यवाही केली जाणार आहे. यासाठीच भविष्यात रुग्णालयांसाठी महापालिकेची परवानगी बंधनकारक करण्यात येणार आहे. या रुग्णालयांवर महापालिकेचे नियंत्रण आल्यानंतर गंभीर प्रकरणावेळी कारवाई करण्यातही सुसूत्रता येणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगलीPoliceपोलिस