शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Sangli Election राज्य जमेना, ते सांगली काय सांभाळणार: अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 23:25 IST

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ...

सांगली : चार वर्षात भाजपने राज्याची अवस्था वाईट केली आहे. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असा जाब विचारण्याची वेळ आली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जीएसटीने साºयाच घटकांचे कंबरडे मोडले आहे. ज्यांना राज्य सांभाळता येत नाही, ते सांगली काय सांभाळणार, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी रविवारी भाजप व मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचारार्थ चव्हाण यांची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आ. अब्दुल सत्तार, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयश्रीताई पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, श्रीनिवास पाटील उपस्थित होते.ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा करू शकले नाहीत. सांगलीत प्रचारालाही येऊ शकले नाहीत. मराठा आरक्षणावरून राज्यात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. धनगर, मुस्लिम समाजातही नाराजी आहे. मुख्यमंत्र्यांना तोंड दाखवायलाही जागा उरलेली नाही. ते काय सांगलीचा सांभाळ करणार? सांगलीने महाराष्ट्राला दिशा दिली आहे. वसंतदादा, राजारामबापूंपासून ते पतंगराव कदम यांच्यापर्यंत अनेकांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यामुळे या शहराला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही. चार वर्षात भाजप सरकारने महापालिकेला कसलीही मदत केली नाही. तरीही महापालिकेने २०० कोटीची कामे केली. आता कुणीही येतो व शिव्याशाप देतो, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. येत्या पाच वर्षात काँग्रेस आघाडीच सांगलीत सुवर्णकाळ आणू शकते. सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ दिल्यास या शहराच्या विकासाची हमी मी घेतो, असे आश्वासनही त्यांनी दिले.जीएसटीने व्यापार उद्ध्वस्त झाला आहे. रोजगार कमी झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चार वर्षात पंधरा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला जाग येत नाही. ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचा डांगोरा पिटला जात आहे. मग आत्महत्या का थांबलेल्या नाहीत? आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही काही तरी करतो आहे, हे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले.जयंत पाटील म्हणाले की, चार वर्षांत भाजपचे नेते जे बोलले त्यातील काहीच काम त्यांनी केले नाही. केवळ जाती-धर्मात तेढ वाढविण्याचे काम केले आहे. सांगण्यासारखे काहीच नसल्याने जातीय तणाव वाढविला जात आहे. पुन्हा अच्छे दिन आणायचे असतील, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच पर्याय असल्याचे सांगितले.भाजपकडून जनतेचा विश्वासघातदेशात महागाई वाढली आहे, व्यापार, उद्योगधंदे बंद पडत आहेत, शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, नोटाबंदीचा त्रास सहन करावा लागला, मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या नावाखाली चार वर्षे खेळवत ठेवले. भाजप सरकारच्या काळात एकही घटक समाधानी नाही. जनतेचा विश्वासघात झाला आहे. त्यामुळेच देशात वातावरण बदलत असून, परिवर्तनाच्या या लढाईत सांगलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन आ. विश्वजित कदम यांनी केले.

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस