शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत अट्टल चोरट्यास अटक

By admin | Updated: January 29, 2015 00:17 IST

१२ दुचाकी जप्त : शहर पोलिसांची कारवाई; आणखी गुन्हे उघडकीस येणार

सांगली : शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने आकाश ऊर्फ बाबू तुकाराम घनवट (वय २९, रा. राजापूर, जि. सातारा, सध्या रा. मेकळ, जि. पुणे) या अट्टल दुचाकी चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून एकूण साडेतीन लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. सांगली शहरासह सातारा जिल्ह्यातून या दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. याबाबत शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. सांगलीमध्ये गेल्या वर्षभरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी कोणत्याही परिस्थितीत चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस. सी. पांचाळ, उपनिरीक्षक वाय. बी. कामटे, आदींच्या पथकाने सापळा रचून आकाश घनवट यास अटक केली. तो सांगलीच्या गणपती पेठ येथे दुचाकी चोरताना रंगेहात सापडला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, तो अट्टल दुचाकी चोरटा असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी दुचाकी त्याच्याकडून जप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली.घनवट याने या दुचाकी सातारा जिल्ह्यातील वडूज, दहीवडी, फलटण आदी ठिकाणांहून चोरल्या असून, सांगलीमध्ये गणपती पेठ व वखारभागातूनही काही दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद केली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे करीत आहेत. (प्रतिनिधी)पाच हजारांत दुचाकीघनवट याच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या सर्व दुचाकी एकाच कंपनीच्या आहेत. चोरी केल्यानंतर त्याने या दुचाकींची केवळ चार ते पाच हजाराला विक्री केली आहे. उर्वरित रक्कम नंतर नेतो, कागदपत्रे देतो, असे सांगून त्याने खरेदीदारांना फसविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.